(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ayodhya: अयोध्येत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, दोन मशिदींच्या गेटवर आक्षेपार्ह शब्द लिहिलेले कागद फेकले
Ayodhya Latest News: देशभरात हनुमान चालिसावरून राजकारण तापलेले असताना आता उत्तर प्रदेशातील अयोध्येत एक नवीन प्रकरण समोर आलं आहे.
Ayodhya Latest News: देशभरात हनुमान चालिसावरून राजकारण तापलेले असताना आता उत्तर प्रदेशातील अयोध्येत एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. येथे काही समाजकंटकांकडून शहरातील कोतवाली नगर परिसरातील दोन मशिदी आणि एका ठिकाणी अपशब्द लिहिलेला कागद रस्त्यावर फेकण्यात आला आहे. या कागदावर गैर-समुदायाच्या पवित्र ग्रंथाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती, या प्रकरणाची माहिती मिळताच अयोध्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणावरून पोलिसांनी मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक देखील घेतली आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी धर्मगुरूंना देण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आयुक्त नवदिव रिनवा, आयजी केपी सिंह डीएम नितीश कुमार आणि एसएसपी शैलेश पांडे हे अयोध्येत दाखल झाले व त्यांनी येथील स्थानिकांची भेट घेतली.
सध्या परिसरात शांततापूर्ण वातावरण आहे. या प्रकरणी डीएम नितीश कुमार आणि एसएसपी शैलेश पांडे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे या समाजकंटकांचा शोध घेत आहेत. या अराजक घटकांवर लवकरच कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही स्थानिकांना देण्यात आले आहे.
दरम्यान, देशभरात धार्मिक हिंसाचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. अलीकडेच दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. याचेच पडसाद देशभरात उमटले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 23 हुन अधिक आरोपीना अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
SBI Farmers : एसबीआयचा आडमुठेपणा, 31 पैशांसाठी शेतकऱ्याला रखडवलं आणि मग..