एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला
काही समर्थकांनी पाहणी करायला आलेल्या जिल्हाधिकारी गौरी पराशर यांच्यावरच थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी एका कम्पांऊडवरुन त्यांना सुरक्षितस्थळी हलवलं.
पंचकुला : बाबा राम रहीमच्या गुंडांमुळे केवळ सर्वसामान्यच नाही, तर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण असल्याचं चित्र आहे. काल पंचकुलाच्या जिल्हाधिकारी गौरी पराशर पंचकुलाम एका ठिकाणी बंदोबस्ताची पाहणी करत होत्या. त्यावेळी गुंडांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला आणि जिल्हाधिकाऱ्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.
बाबा राम रहीमवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यावर काल शुक्रवारी हरियाणाच्या पंचकुलामध्ये बाबा समर्थकांनी धुडगूस घातला. यावेळी काही समर्थकांनी पाहणी करायला आलेल्या जिल्हाधिकारी गौरी पराशर यांच्यावरच थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी एका कम्पांऊडवरुन त्यांना सुरक्षितस्थळी हलवलं. काल दुपारी 4 वाजताची हा सर्व प्रकार घडला आहे.
पाहा व्हिडिओ :
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. 15 वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी काल हा निकाल दिला. मात्र कोर्टाच्या या निर्णयानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 31 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर 300 हून अधिकजण जखमी झाले आहेत.
बाबा राम रहीम याला सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात किमान सात वर्षे आणि कमाल दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
काल शुक्रवारी दुपारनंतर हरियाणा, पंजाबसह चार राज्यांमध्ये ठिकठिकाणी बाबा समर्थकांनी मोठा धुडगूस घातला. यात तीन न्यूज चॅनेलच्या ओबी जाळण्यात आल्या तसंच सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. बाबा समर्थकांनी काल संध्याकाळी जवळपास 200 गाड्या जाळल्या आहेत.
या सर्व हिंसाचारावर आता काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. राम रहीम समर्थकांच्या 65 गाड्या आणि त्यातील शस्त्रही पोलिसांनी जप्त केली आहेत. दरम्यान बाबा गुरमीत राम रहीमला दोषी ठरवणाऱ्या न्यायाधिशांची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून लष्करानं त्यांना ताब्यात घेतलं आहे. पंजाब, हरियाणात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या दोन्ही राज्यांना छावणीचे स्वरुप आलं आहे.
पंजाब आणि हरयाणातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा 72 तासांसाठी बंद केली आहे. चंदीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी दिली आहे. पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती.
डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं.
जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी साध्वींचंही लैंगिक शोष झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही.
ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले.
2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले.
जुलै 2016 : खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते.
जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली.
25 जुलै 2017 : सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकडून लवकरच निकाल लावता येईल.
17 ऑगस्ट 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement