एक्स्प्लोर
Advertisement
संशयित समजून यूपी पोलिसांनी अॅपलच्या एरिया मॅनेजरलाच गोळी घातली
पोलिसांनी गोळी झाडल्यानंतर ही कार खांबावर आदळली. त्यामुळे तरुणाचा मृत्यू गोळी लागून झाला, की खांबावर आदळून याचा तपास आता केला जात आहे.
लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यूपीची राजधानी लखनौमधील गोमतीनगर परिसरात पोलिसांनी संशयित समजून एका युवकावरच गोळी झाडल्याचं समोर आलं आहे.
या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री बारा वाजता मृत्यू झाला. “कार चालवणारा हा तरुण संशयित वाटत होता, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर कार चढवण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर गोळी घातली,” असा दावा पोलिसांनी केला आहे.
“गोमतीनगर परिसरात एक कार उभी असताना समोरुन दोन पोलीस कर्मचारी येत होते. पोलिसांना पाहताच ही कार निघून जात होती. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच गोळी चालल्याचा आवाज आला. अचानक गाडी एका खांबावर आदळली. विवेक त्यानंतर रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू गोळी लागल्याने झाला की गाडी खांबावर आदळल्याने याचा तपास सुरु आहे,” अशी माहिती लखनौचे एसएसपी कलानिधी नैथानी यांनी दिली.
सुलतानपूर इथे राहणारा विवेक हा तरुण अॅपल कंपनीच्या एरिया मॅनेजर या पदावर काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. याचदरम्यान विवेकच्या महिला सहकाऱ्याला मीडियाशी बोलू नये यासाठी पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्याने गोळी मारल्याची घटनेची ही महिला सहकारी प्रत्यक्षदर्शी आहे. तिला पोलिसांनी गोमतीनगरमधील तिच्या घरीच नजरकैदेत ठेवलं आहे, जेणेकरुन तिला मीडियाशी बोलता येणार नाही. गोळीबाराची घटना घडली तेव्हा ती विवेकसोबत कारमध्ये होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्राईम
बीड
Advertisement