(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Assembly Election Phase 2 Voting : पश्चिम बंगाल, आसामच्या दुसर्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
WB Election 2021 : बंगाल आणि आसामच्या दुसर्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. नंदीग्राममधील ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी या लक्षणीय लढतीसाठी आज मतदान होतेय.
WB Election 221 : बंगाल आणि आसामच्या दुसर्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. नंदीग्राममधील ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी या लक्षणीय लढतीसाठी आज मतदान होतेय. ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. आज पश्चिम बंगालच्या 4 जिल्ह्यांतील 30 जागांवर निवडणुका होणार आहेत, तर आसाममधील 13 जिल्ह्यांमधील 29 जागांवर निवडणुका होत आहेत. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यात हाय-व्होल्टेज निवडणूक प्रचार झाला. ममता बॅनर्जी स्वत: कित्येक दिवस नंदीग्राममध्ये राहिल्या, तर अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 84.13 टक्के मतदान झाले. दुसर्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 171 उमेदवारांची भवितव्य ठरणार आहे.
WB Election 2021 | बंगालच्या राजकारणात ममता आणि मोदींचा 'खेला होबे'चा सूर, कशी तयार झाली ही घोषणा?
पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 84.13 टक्के मतदान झाले. दुसर्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 171 उमेदवारांची भवितव्य ठरणार आहे. मतदारांची संख्या 75 लाख 94 हजार 549 आहे. बूथची एकूण संख्या 10 हजार 620 आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रानुसार, दुसर्या टप्प्यातील निवडणुकांसाठी सर्व बूथ संवेदनशील मानली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांवरही निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. क्विक रिस्पॉन्स टीमसह नंदीग्राममधील प्रत्येक बूथवर सूक्ष्म निरीक्षकही उपस्थित असतील. येथे वेब कास्टद्वारे 75 टक्के बूथचे सर्वेक्षण केले जाईल. सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 या वेळेत मतदान होईल. मागील विधानसभा निवडणुकीत टीएमसीला 21, कॉंग्रेसला 3, सीपीएम 4, सीपीआय 1 आणि भाजपला 1 जागा मिळाली होती, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसी 18 आणि भाजपला या 30 जागांवर 12 जागा मिळाल्या.
मुख्य उमेदवार कोण आहेत
नंदीग्राम - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपाचे शुभेन्दू अधिकारी आणि सीपीएमच्या मिनाक्षी मुखर्जी
डेबरा - भाजपचे भारती घोष विरुद्ध टीएमसीचे हुमायून कबीर
बांकुरा - अभिनेत्री-टीएमसीच्या उमेदवार सयंतिका बॅनर्जी विरुद्ध भाजपा निलाद्री शेखर दाना
खरगपूर सदर- अभिनेता-भाजपाचे उमेदवार हिरण चटर्जी वि. टीएमसीचे प्रदीप सरकार
सबंग- टीएमसीचे मानस रंजन भुनिया विरुद्ध भाजपाची अनमोल मायती
मोयना- अशोक दिंडा विरुद्ध टीएमसीचे संग्राम दोलाई भाजपाचे उमेदवार.
चांदीपूर- टीएमसीचे सोहम चक्रवर्ती विरुद्ध भाजपाचे पुलक कांती गुरिया.
मागील वेळी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीने 211 जागा जिंकल्या होत्या. यावेळी टीएमसी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करीत आहे. दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की यावेळी बंगालच्या लोकांनी परिवर्तन करण्याचा विचार केला आहे. भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा ते दावा करीत आहे. तर काँग्रेस-डावी आघाडी आणि आयएसएफची महायुतीदेखील सरकार स्थापनेचा दावा करीत आहेत. बंगालमधील एकूण 294 जागांसाठी आठ टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज
पश्चिम बंगालमध्ये 2016 मध्ये टीएमसीला 44.9 टक्के मते मिळाली होती, असा अंदाज वर्तविला जात आहे की यावेळी ही मते दीड टक्क्यांनी कमी होऊन 43.4 टक्के होऊ शकतात. याचा फायदा भाजपला होताना दिसून येत आहे. मागील वेळी 10.2 टक्के मते मिळाली होती, ती यावेळी वाढून 38.4 टक्के होण्याचा अंदाज आहे, म्हणजेच 28.2 टक्के फायदा होत आहे. तर सर्वात जास्त नुकसान काँग्रेस आणि डाव्या आघाडीला होताना दिसत आहे. मागील वेळी त्यांना 37.9 टक्के मते मिळाली होती, यावेळी केवळ 12.7 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. म्हणजे उणे 25.2 टक्के नुकसान होणार आहे. गेल्या वेळी इतरांना 7 टक्के मते मिळाली होती, तर यावेळी साडेपाच टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे, म्हणजे दीड टक्के कमी झाली आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप टीएमसीला जोरदार टक्कर देताना दिसत असली तरी सत्ता टीएमसीचीच येताना दिसत आहे. सीव्हीओटरच्या ओपनियन पोलनुसार टीएमसीला 150 ते 166 जागा मिळू शकतात. भाजपला 98 ते 114 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. काँग्रेस आणि डाव्यांच्या जागा 23 ते 31 जागांवर येऊ शकतात. तर 3 ते 5 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.
WB Election 2021 ग्राऊंड रिपोर्ट : ममता की शुभेंदु... नंदिग्राम मतदारसंघात कोण मारणार बाजी?