Assam Train Accident: राजधानी एक्स्प्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, भीषण अपघातात आठ हत्तींचा मृत्यू; इंजिनसह रेल्वेचे पाच डबे घसरले
Assam Train Accident: मिझोराममधील सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या 'राजधानी एक्स्प्रेस' रेल्वेच्या अपघातात आठ हत्ती ठार, तर एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Assam Train Accident: मिझोराममधील सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या 'राजधानी एक्स्प्रेस' रेल्वेच्या अपघातात आठ हत्ती ठार, तर एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आसाममधील होजाई जिल्ह्यातील छंगजुराई भागात मध्यरात्री 2 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास घडली आहे.
Assam Train Accident: हत्तींचा कळप रेल्वे रूळ ओलांडताना अपघात
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेला धडक लागली. या धक्क्यामुळे इंजिनसह पाच डबे रेल्वे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. ही घटना गुवाहाटीपासून सुमारे 126 किमी अंतरावर घडली.
STORY | 8 elephants killed after being hit by Sairang-New Delhi Rajdhani Exp in Assam's Hojai dist: Official
— Press Trust of India (@PTI_News) December 20, 2025
Eight elephants were killed and one injured after a herd was hit by the Sairang-New Delhi Rajdhani Express in Assam’s Hojai district in the wee hours of Saturday, a… pic.twitter.com/7ToC6EW9vi
Assam Train Accident: रेल्वे सेवा विस्कळीत, हेल्पलाइन जारी
अपघातानंतर काही कालावधीसाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली, काही रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले. रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, घसरलेल्या डब्यांतील प्रवाशांना इतर डब्यांमध्ये जागा देण्यात आली आणि सकाळी सहा वाजता ही राजधानी एक्स्प्रेस गुवाहाटीकडे रवाना झाली. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर या रेल्वेला आणखी डबे जोडले जातील.
Assam Train Accident: वनविभागाकडून हत्तींच्या मृत्यूची माहिती
वनविभागाचे अधिकारी म्हणाले की, हत्तींचा कळप रेल्वे रूळ ओलांडत असताना धडक लागल्यामुळे आठ हत्ती ठार झाले आहेत तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात वन्यजीवनासाठी धक्कादायक ठरला आहे. रेल्वे व वनविभाग या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या























