एक्स्प्लोर
बालाकोट एअर स्ट्राईकची योजना बनवणाऱ्या सामंत यांची 'रॉ'च्या अध्यक्षपदी नियुक्ती
केंद्रातल्या मोदी सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि रिसर्च अॅन्ड अॅनालिसिस विंग (रॉ) च्या नव्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि रिसर्च अॅन्ड अॅनालिसिस विंग (रॉ) च्या नव्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे. 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची आयबीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांची रॉच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयबीचे नवे संचालक अरविंद कुमार यांचा काश्मीरप्रश्नी मोठा अभ्यास आहे. नवे सरकार काश्मीरप्रश्नी गंभीर आहे, त्यामुळेच मोदी सरकारने अरविंद कुमार यांना आयबीच्या संचालकपदी नियुक्त केले आहे. असे बोलले जाते की, आयपीएस सामंत गोयल यांनीच बालाकोट एअर स्ट्राईकची योजना आखली होती. एअर स्ट्राईक यशस्वी झाल्याचे अनेकांचे मानने आहे, त्यामुळे सामंत यांची रॉच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यानंतर विरोधी पक्ष आणि माध्यमं सातत्याने देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्यामुळेच नव्या सरकारच्या स्थापनेनंतर सुरक्षेसंबधी त्वरीत पावले उचलली जात आहेत.
बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून | बालाकोट | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
