महिला सबलीकरणासाठी केजरीवालांची मोठी घोषणा, प्रत्येक महिलेला दर महिना घरबसल्या 1 हजार रुपये देणार!
Punjab Election 2022 : जर कुटुंबात सासू, सून आणि मुलगी असेल तर तिघींच्या बँक खात्यात हजार-हजार रुपये जमा होतील, असे केजरीवाल म्हणाले.
Punjab Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. ’जर आमचं सराकर आलं तर 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला प्रति महिना एक हजार रुपये देऊ,’ अशी घोषणा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली आहे. सोमवारी केजरीवाल मोगा येथील रॅलीला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, “ आमचं सरकार पंजाबमध्ये सत्तेत आलं तर प्रत्येक महिलेला प्रति महिना एक हजार रुपये देऊ. जर कुटुंबात सासू, सून आणि मुलगी असेल तर तिघींच्या बँक खात्यात हजार-हजार रुपये जमा होतील. ज्या महिलांना वयोवृद्ध पेन्शन मिळत आहे, त्यांच्याही खात्यात पेन्शनशिवाय एक हजार रुपये जमा केले जातील. हा जगातील सर्वात मोठा महिला सबलीकरण कार्यक्रम आहे. पंजाबमधील निवडणुकीत महिलाच ठरवतील कुणाला मतदान करायचं.”
दुनिया में कोई सरकार नहीं है, जिसने माओं, बहनों और बेटियों के खाते में ₹1000 डाले हो।#KejriwalDiTeejiGuarantee पंजाब की महिलाओं की कैसे करेगी मदद?
— AAP (@AamAadmiParty) November 22, 2021
देखिए- pic.twitter.com/Byuz6dvqRM
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचं पाऊस पडताना दिसत आहे. यामध्ये केजरीवाल यांचीही भर पडली आहे. पुढील वर्षी पंजाब, उत्तर प्रदेश, गोव्यामध्ये विधानसभा निवडणूका (Assembly Election 2022) होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडत आहे. अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर मतदारांना आकर्षीत करण्यासाठी केजरीवाल यांनी रिक्षा चालकाच्या घरी जेवणही केलं.
मोगा येथील ऱॅलीला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, “ पंजाबमध्ये सध्या एक नकली केजरीवाल फिरत आहे. मी जे काही जाहीर करतो तेच ही व्यक्ती दुसऱ्या दिवशी घोषणा करते. मात्र, या नकली केजरीवालपासून सावध राहा. तुम्हाला दिलेली आश्वासनं केवळ हा असली केजरीवालच पूर्ण करेल.” असं म्हणत केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर निशाणा साधलाय.
ALERT 🚨 IMPOSTER IN TOWN!
— AAP (@AamAadmiParty) November 22, 2021
A new guy, named "Nakli Kejriwal" is seen in Punjab posing as an "Aam Aadmi"
He has been shamelessly "Copying" Original Kejriwal's Model but is failing to implement it.
WARNING: DO NOT VOTE FOR HIM!#KejriwalDiTeejiGuarantee pic.twitter.com/pz1Keq8nhl
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha