माझा जन्म कृष्ण जन्माष्टमीचा, या 'कंसांना' सोडणार नाही; अरविंद केजरीवालांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
Arvind Kejriwal on Gujarat Posters : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. गुजरात दौऱ्यावर एका रॅलीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. माझा जन्म कृष्ण जन्माष्टमीचा आहे. मी या कंसांना सोडणार नाही, असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी गुजरातमधील रॅलीमध्ये भाजपवर प्रहार केला. दिल्लीतील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी हिंदू देवी-देवतांवर दिलेल्या शपथवरुन सुरु झालेल्या वादावरुन केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बडोद्यामध्ये तिरंगा यात्रा असताना केजरीवाल यांच्याविरोधात काही पोस्टर लावण्यात आले होते. यावर केजरीवाल यांनी देवाचा अपमान केल्याचं लिहिण्यात आले होतं. यावर बोलताना केजरीवाल म्हणाले की, या सर्व कंसाच्या औलादींना संपवण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मी हनुमानाचा कट्टर भक्त आहे. तसेच माझा जन्म कृष्ट जन्माष्टमीच्या दिवशी झाला आहे.
अब ये लोग भगवान को भी बदनाम करने लगे हैं। ये सारी असुरी शक्तियाँ एक हो गईं हैं।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 8, 2022
मैं एक बेहद धार्मिक आदमी हूँ। मेरा जन्म श्री कृष्ण जन्माष्टमी के दिन हुआ था। भगवान श्री कृष्ण ने मुझे एक काम देकर भेजा है - इन कंस की औलादों का सफ़ाया करना, जनता को इनसे मुक्ति दिलाना। pic.twitter.com/lBhQqNQWKx
बडोद्यामध्ये जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, पावसामध्येही तुम्ही आमची वाट पाहिली. खराब हवामानामुळे आम्हाला हेलिकॉप्टरनं प्रवास करताना आला नाही. पण तुम्हाला भेटायचं होतं, त्यामुळे तीन तास रस्त्यानं प्रवास करत इथं आलो. इथं थांबवात त्याबद्दल सर्वांचे आभार....
ते म्हणाले की, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, जेव्हा माझं गुजरात दौऱ्यावर येणं निश्चित झालं. त्यावेळी या लोकांनी गुजरातमधील शहरात माझ्याविरोधात जागोजागी पोस्टर आणि होर्डिंग लावले. ते पण ठिकाय. हे लोक माझा तिरस्कार करतात. मला काहीही म्हटले तरी ठिकाय. पण या लोकांनी देवाचा अपमान केला आहे. यांनी देवाच्या विरोधात अपशब्द वापरले आहेत. मी एक धार्मिक व्यक्ती आहे. हनुमानाचा कट्टर भक्त आहे. या सर्व असुरी शक्ती माझ्याविरोधात एकवटल्या आहेत. पण देव आमच्यासोबत आहे, लोक आमच्यासोबत आहेत. येथील जनतेला बदलाव हवाय, त्यामुळे हे लोक गोंधळले आहेत. त्यामुळे माझ्याविरोधात कटकारस्थान करत आहेत.
भाजपा के पिछले 27 साल के कुशासन को पीछे छोड़ अब गुजरात की जनता परिवर्तन के लिए तिरंगा लेकर बाहर आ गई है। वडोदरा के अपने भाई-बहनों के साथ तिरंगा यात्रा। 🇮🇳 https://t.co/YIg6Ypgafa
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 8, 2022
आणखी वाचा