एक्स्प्लोर

स्विस बँकेतील सगळाच पैसा ‘ब्लॅकमनी’ नाही : अरुण जेटली

स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशांमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यावर अरुण जेटलींकडून त्यावर उत्तर दिले गेले.

नवी दिल्ली : “स्विस बँकेत जमा झालेला सगळाच पैसा हा टॅक्स चोरी करून किंवा अनधिकृतपणेच जमा केलेला आहे, असं म्हणता येणार नाही,” असं विधान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशांमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यावर अरुण जेटलींकडून त्यावर उत्तर दिले गेले. याबाबत अरुण जेटलींनी एक लेख लिहित सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जेटली म्हणाले,भारतीयांनी भारताबाहेर ठेवलेला पैसा अनेक श्रेणींमध्ये विभागला गेला आहे. त्यामध्ये अनेक एनआरआय तसंच मूळ भारतीय वंशाचे असलेल्या पण सध्या विदेशी पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तींनीही जमा केलेल्या पैशाचाही समावेश आहे. तर काहींनी अधिकृतपणे आपला पैसा स्विस बँकेत ठेवला आहे. त्यामुळे आता फक्त जे भारतात राहुन पैसा बाहेर पाठवत आहेत, अशांवरच कारवाई करण्याची गरज आहे. जेटलींनी लिहिलंय, “अनधिकृतपणे पैसा जमा होण्याबाबत स्वित्झर्लंडची स्थिती आजही पहिल्यासारखीच आहे. स्वित्झर्लंडने भारताबरोबर एक करार केला आहे, ज्यानुसार भारतीयांकडून तिथे जमा होणाऱ्या पैशाचे आकडे 2019 पासून स्वित्झर्लंड भारताला कळवणार आहे.” काय आहे स्विस बँकेची नवी आकडेवारी? स्विस नॅशनल बँकेच्या आकडेवारीनुसार, मागच्या एका वर्षात या बँकेत भारतीयांकडून जमा करण्यात आलेल्या पैशात 50 टक्कांची वाढ झाली आहे. ही रक्कम सुमारे सात हजार कोटींवर पोहोचली आहे. 13 वर्षांनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. राहूल गांधींची सरकारवर टीका काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी ब्लॅकमनीबाबत केलेल्या वक्तव्यांची आठवण करुन देत सरकारवर जोरदार टीका केली. राहूल गांधीनी ट्वीट करत म्हटलंय की, “2014 मध्ये ते म्हणत होते, स्विस बँकेतून काळपैसा परत आणला जाईल आणि प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करू. 2016 मध्ये ते म्हणाले, नोटबंदीने काळापैसा नष्ट होईल. आणि आता 2018  मध्ये ते म्हणतात, भारतीयांच्या स्विस बँकेतील व्हाईटमनीत 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. स्विस बँकेत काळपैसाच नाही.”

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget