एक्स्प्लोर
....तर सडेतोड उत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही, लष्कप्रमुखांचा शत्रूंना इशारा
नवी दिल्ली : सैन्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी देशाच्या शत्रूंना इशारा दिला आहे. "आम्हाला नियंत्रण रेषा आणि सीमेवर शांतता हवी आहे. मात्र, शत्रूंकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास सडेतोड उत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही.", असा इशारा लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी शत्रूंना दिला आहे.
शहिदांना श्रद्धांजली वाहताना लष्करप्रमुख म्हणाले, "शहीद जवानांना सलाम, ज्यांनी आपलं बलिदान दिलं. जवानांच्या बलिदानामुळेच आपण सर्व सुखरुप आहोत. जवान आणि त्यांच्या कुटुंबाचे कायम ऋणी राहू."
"काही जवान आपल्या समस्या मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. याचा परिणाम शूर जवानांवर पडेल", असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले.
सैन्य दिनाचं औचित्य साधून लष्करप्रमुखांनी 15 सैनिकांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. यामध्ये 5 जवानांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement