एक्स्प्लोर

तुम्ही भारतीय आहात की अमेरिकन? गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणतात...

सध्याचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी 2004 मध्ये गुगलमध्ये नोकरी सुर केली होती.

मुंबई : सुंदर पिचाई... गुगलसारख्या एवढ्या मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ. एक भारतीय वंशाची व्यक्ती एवढ्या मोठ्या कंपनीच्या सर्वोच्च पदावर असल्याचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. मात्र परदेशात इतकी वर्ष राहूनही सुंदर पिचाई यांचं भारतासोबतच नातं तेवढंच घट्ट आहे. त्यांनी बीसीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते दिसून आलं. 

बीबीसीने घेतलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही अमेरिकन आहात की भारतीय? त्यावर सुंदर पिचाई यांनी उत्तर दिलं की, आता मी अमेरिकेचा नागरिक आहे, मात्र भारत माझ्या मनात खोलवर रुतलेला आहे आणि तो कायम आहे. मी आज जो काही आहे, त्यात भारताचा वाटा सर्वात मोठा आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स क्रांती आणणार

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितलं की,  आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि क्वांटम कॉ्म्प्युटर येत्या 25 वर्षांत क्रांती घडवून आणेल. आता हे नक्की काय आहे ते जाणून घेऊया. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सबाबत पिचाई म्हणाले, "मी याला मानवनिर्मित सर्वोत्तम तंत्रज्ञान म्हणून मानतो. आता आपण अग्नी, वीज किंवा इंटरनेटबद्दल जे विचार करता, हे देखील तसंच होणार आहे. मला वाटतं कदाचित त्यापेक्षा चांगले असेल. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स प्रणाली मानवांप्रमाणेच काम करण्यासाठी तयार केली जाते. विशेषत: विशिष्ट प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

आयआयटी, खडगपूरमधून घेतली इंजिनीअरिंगची पदवी

सुंदर पिचाई यांची 2015 मध्ये ऑगस्ट महिन्यात गुगलच्या सीईओपदी वर्णी लागली. पिचाई हे टेक वर्ल्डमधील मोठं नावं आहे. सुंदर पिचाई 2004 पासून गूगलमध्ये काम करत आहेत. पिचाई हे गूगलच्या अँड्रॉईड, क्रोम आणि अप्स डिव्हिजनचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट होते. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलपमेंटमध्ये सुंदर पिचाई यांची महत्त्वाची भूमिका होती. पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर होते, तर सुंदर पिचाई यांना लहानपणापासूनच गॅझेट्सची आवड होती.

सुंदर पिचाई यांचा जन्म चेन्नईमध्ये 1972 मध्ये झाला होता. पिचाई यांना पेन्सिलव्हानिया यूनिव्हर्सिटीमध्ये सायबेल स्कॉलर नावाने ओळखलं जात होतं. पिचाई यांनी त्यांची इंजिनीअरिंगची पदवी आयआयटी, खडगपूरमधून घेतली आहे. ते बॅचमधील सिल्वर मेडलिस्ट होते. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये सुंदर यांनी एमएसचं शिक्षण पूर्ण केलं तर वॉर्टन यूनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget