एक्स्प्लोर

गुगल बॉस, मला नोकरी करायची आहे, पिचाईंना चिमुरडीचं पत्र

न्यूयॉर्क : लहानपणी डॉक्टर, इंजिनिअरपासून पायलट, एअर हॉस्टेसपर्यंत अनेक करिअर करण्याची स्वप्नं आपण पाहिलेली असतात. जसजसं वय वाढतं, तशी ही स्वप्न बदलत जातात. तंत्रज्ञानात रस असणाऱ्यांना टेक इंडस्ट्रीतील बलाढ्य 'गुगल' कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असते. मात्र एका सात वर्षांच्या चिमुरडीने गुगलमध्ये काम करण्याची इच्छा फक्त स्वतःपाशी ठेवली नाही, तर थेट गुगलाधीशांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. क्लो ब्रिजवॉटर या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीने गुगलला पत्र लिहून आपली गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गुगलच्या प्रमुखांचं नाव माहित नसल्याने किंवा कोणाला उद्देशून पत्र लिहावं, हे ठाऊक नसल्याने तिने 'डिअर गुगल बॉस' अशी गोड हाक पत्राच्या सुरुवातीला मारली आहे. सात वर्षांच्या क्लोला कॉम्प्युटर, रोबो, किंडल यांची प्रचंड आवड आहे. गुगलच्या ऑफिसमधले फोटो अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ते पाहूनच क्लोने आपल्याला बीन बॅग्ज, स्लाईड्स आणि गोकार्ट्स या गोष्टीही आपल्याला आवडत असल्याचं पत्रात लिहिलं आहे. गुगल बॉस, मला नोकरी करायची आहे, पिचाईंना चिमुरडीचं पत्र कौतुकाची गोष्ट म्हणजे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या पत्राची दखल घेत त्याला उत्तरही धाडलं आहे. तुझं शालेय शिक्षण पूर्ण झालं की तुझ्या नोकरीच्या अर्जाचा नक्की विचार करेन, असा सकारात्मक रिप्लाय त्यांनी केला आहे. क्लोच्या वडिलांनी सुंदर पिचाईंनी दिलेला प्रतिसाद 'लिंक्डइन'वर शेअर केला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'तुला कॉम्प्युटर आणि रोबो आवडतात, याचा आनंद वाटला. जर तू अशीच मेहनत घेतलीस, आणि स्वप्नांचा मागोवा घेत राहिलीस, तर तू डोळ्यांसमोर ठेवलेली सगळी उद्दिष्ट पूर्ण होतील, याची मला खात्री आहे. गुगलमध्ये नोकरी करण्यापासून ऑलिम्पिकमध्ये स्वीमिंग करण्यापर्यंत तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर तुझा नोकरीचा अर्ज पाहण्यासाठी मी उत्सुक असेन. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना शुभेच्छा' असं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. गुगल बॉस, मला नोकरी करायची आहे, पिचाईंना चिमुरडीचं पत्र

महत्त्वाच्या बातम्या

Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget