एक्स्प्लोर

Mekapati Reddy : आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री मेकापती गौतम रेड्डी यांचं निधन; 50व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mekapati Reddy : आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग मंत्री मेकापती गौतम रेड्डी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

Mekapati Reddy : आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग मंत्री मेकापती गौतम रेड्डी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 50 वर्षांचे होते.  रेड्डी हे त्यांच्या राहत्या घरी अचानक कोसळले. त्यामुळे त्यांना आज सकाळी पावणे आठ वाजता उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला.  

 मेकापती गौतम रेड्डी यांना कुटुंबीयांनी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते.  त्यांना श्वास घेता येत नव्हता, त्यांना हृदयविकाराचा झटका  आल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अपोलो रूग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

रूग्णालयात दाखल केल्यानंतर रेड्डी यांच्यावर तत्काळ सीपीआर शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवाय आपत्कालीन विभागात प्रगत कार्डियाक लाईफ सपोर्टही देणायात आला. इमर्जन्सी मेडिसिन टीम आणि ह्रदयरोग तज्ञ त्यांच्यावर उपचार करत होते. रूग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्यावर 90 मिनिटांपेक्षा जास्त काळ सीपीआर करण्यात आला. परंतु, आम्ही खूप प्रयत्न करूनही त्यांना वाचवू शकलो नाही. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.  

Mekapati Reddy : आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री मेकापती गौतम रेड्डी यांचं निधन; 50व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील आत्मकुरु विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते जगनमोहन रेड्डी यांच्या  सरकारच्या मंत्रिमंडळातील उद्योग, वाणिज्य, आयटी आणि कौशल्य विकास विभाग सांभाळत होते. दरम्यान, गेल्या आठवड्यातच रेड्डी हे दुबई दौऱ्यावर गेले होते. आंध्र सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दुबई ऑटो एक्सपोमध्ये अबू धाबी रोड शो कार्यक्रम आयोजित केला होता. येथे त्यांनी अनेक व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांची भेट घेतली होती.  

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Seat Sharing : रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीत शिवसेनेला नाशिकची जागा मिळाली? प्रकरण काय?Ramdas Kadam Full PC : राज ठाकरेंचा फोन आला म्हणून शांत बसलो! राणे-खेडेकर कदमांच्या टार्गेटवरSambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार ठरला? संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चाPune Mall Fire : पुणे-नगर रोडवरील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची वाहनं रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
Embed widget