(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hijab controversy : हिजाब बंदीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 10 मुलींविरुद्ध FIR दाखल
नुकतेच हिजाबच्या वादावर उच्च न्यायालयाने म्हटले होते की, जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत कर्नाटकातील कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये कोणीही धार्मिक पोशाख घालणार नाही.
Hijab controversy : कर्नाटकातून (karnataka) सुरुवात झालेल्या हिजाब वादाचे (Hijab Controversy) पडसाद संपूर्ण देशात पसरले. या प्रकरणाी अनेक राज्यांतील ज्येष्ठ नेत्यांपासून ते जनतेपर्यंत या विषयावर आपली मते मांडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, 16 फेब्रुवारीला हिजाब बंदीच्या वादामुळे बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. 17 फेब्रुवारीला, हिजाब आणि बुरखा परिधान केलेल्या काही मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब नियमाचा निषेध केला. जेव्हा त्यांना तुमकूरमधील गर्ल्स एम्प्रेस सरकारी पीयू कॉलेजच्या बाहेर प्रवेशापासून रोखण्यात आले. त्यावेळी विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरत 'अल्लाह-हू-अकबर'च्या घोषणाही दिल्या.
10 मुलींवर FIR दाखल
17 फेब्रुवारी रोजी तुमकूर येथे झालेल्या निदर्शनावर कारवाई करत, आता कर्नाटक पोलिसांनी 10 मुलींवर IPC कलम 149 143, 145, 188 अंतर्गत CrPC कलम 144 अंतर्गत जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. FIR नोंदवण्यात आली आहे. नुकतेच हिजाब वादावर उच्च न्यायालयाने म्हटले होते की, जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही तोपर्यंत कर्नाटकातील कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये कोणीही धार्मिक पोशाख घालणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शाळा-महाविद्यालयीन महिला हिजाब आणि बुरखा परिधान करताना दिसल्या. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी कर्नाटक सरकारला न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक करण्याचे आवाहन केल्यानंतर हे पाऊल पुढे आले आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री म्हणाले, "न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणार्यांना जेलमध्ये टाका, मग तो केसरी असो वा हिजाबवाला"
काय प्रकरण आहे
गेल्या महिन्यात उडुपी गव्हर्नमेंट प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या काही विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर हिजाबचा वाद सुरू झाला, ज्यांना वर्गात जाण्याची परवानगी नव्हती. कॉलेजच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जे विद्यार्थी पूर्वी हिजाबशिवाय यायचे, ते आता अचानक हिजाब घालून यायला लागले आहेत. नंतर, विद्यार्थिनींनी हिजाबशिवाय वर्गात जाण्यास नकार देत निषेध केला. आणि हाच मुद्दा वादात सापडला असून कर्नाटकातील इतर जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तणाव निर्माण होऊन हिंसाचारही झाला.
कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब विवाद प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कर्नाटक हायकोर्टाने गुरुवारी सुनावणी करताना अंतिम आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही धार्मिक चिन्हाला परवानगी नसल्याचा आदेश दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या: