एक्स्प्लोर
फोनवरील संभाषण ऐकलं, तरुणाने गर्लफ्रेण्डला चाकूने 17 वेळा भोसकलं
हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरी जिल्ह्यात तरुणाने गर्लफ्रेण्डची 17 वेळा चाकू भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गर्लफ्रेण्ड दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असल्याचा राग मनात ठेवून तरुणाने हे कृत्य केलं आहे.
ईस्ट गोदावरी जिल्ह्याच्या काकीनाडामध्ये ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चंद्रशेखर आणि धनलक्ष्मी रिलेशनशिपमध्ये होते. तसंच ते सोबतच राहायचे. चंद्रशेखरने सोमवारी धनलक्ष्मीच्या मोबाईमध्ये तिचं आणि दुसऱ्या व्यक्तीचं संभाषण ऐकलं. यानंतर चंद्रशेखर संतापला आणि त्याने धनलक्ष्मीवर चाकूने सपासप वार केले.
चंद्रशेखरने 17 वेळा धनलक्ष्मीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात तो स्वत:ही जखमी झाला आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी धनलक्ष्मी आणि चंद्रशेखर यांना रुग्णालयात दाखल केलं. धनलक्ष्मीची प्रकृती नाजून असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी बॉयफ्रेण्ड चंद्रशेखरविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे, अशी माहिती तपास अधिकारी पी.एस. राव यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement