Anant-Radhika Wedding Anniversary: अनंत-राधिकाच्या शाही लग्नाला वर्ष पूर्ण! संस्कृती, अध्यात्म आणि जागतिकतेचा अनोखा संगम, भारतातील एक अभूतपूर्व सोहळा..
Anant-Radhika Wedding Anniversary: 12 जुलै 2024 रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह झाला. हा समारंभ आध्यात्मिक आणि जागतिक राजनैतिकतेचा अभूतपूर्व संगम होता.

Anant-Radhika Wedding Anniversary: 12 जुलै 2024, हीच ती तारीख, ज्या दिवशी देशासह अवघ्या जगाला वैदिक, जागतिक आणि धार्मिक परंपरेचा अभूतपूर्व मेळावा पाहायला मिळाला. कारण होते, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे शाही लग्न! मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या दोघांचा लग्नसोहळा संपन्न झाला, तेव्हा हा भव्य सोहळा पाहून अवघ्या जगाच्या भुवया उंचावल्या, हे लग्न जेव्हा पार पडले, तेव्हा मुंबई शहर अध्यात्म, संस्कृती आणि जागतिक राजनैतिकतेचा संगम बनले. हा समारंभ केवळ एक स्टारडम म्हणूनच नव्हता, तर तो एक आध्यात्मिक आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम होता, ज्याने अवघ्या जगाला भारताच्या परंपरा तसेच त्याची वाढती जागतिक व्याप्ती दाखवून दिली.
भारतातील शाही लग्न, एक अभूतपूर्व सोहळा..!
अनंत अंबानी आणि राधिकाचा हा लग्न सोहळा इतका अभूतपूर्व होता की, काहींनी याला "भारतातील शाही लग्न" असे संबोधले, ज्याने देशाला केवळ एक सांस्कृतिक शक्तीगृह म्हणूनच नव्हे, तर आध्यात्मिक केंद्र म्हणून देखील स्थापित केले. आयोजकांनी सांगितले की, 'या सोहळ्याचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले, तसेच या माध्यमातून जगाची आध्यात्मिक राजधानी म्हणून भारताची प्रतिमा आणखी मजबूत केली.'

आध्यात्मिक गुरूंची उपस्थितीने वाढवली शान!
अनंत आणि राधिका अंबानींच्या लग्नात वैदिक आणि धार्मिक परंपरेतील धार्मिक नेत्यांचा अभूतपूर्व मेळावा पाहायला मिळाला, जो एकतेचे अद्भुत प्रदर्शन करत होता. या सोहळ्यात प्रमुख आध्यात्मिक व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शविली.
- स्वामी सदानंद सरस्वती, शंकराचार्य, द्वारका
- स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, शंकराचार्य, जोशीमठ
- गौरांग दास प्रभू, विभागीय संचालक, इस्कॉन
- गौर गोपाल दास, संन्यासी, इस्कॉन
- राधानाथ स्वामी, नियामक मंडळ सदस्य, इस्कॉन
- पुज्यश्री रमेशभाई ओझा
- गौतमभाई ओझा
- पूज्यश्री देवप्रसाद महाराज
- विजुबेन राजानी, श्री आनंद बावा सेवा संस्था
- श्री बालक योगेश्वरदास जी महाराज, बद्रीनाथ धाम
- पूज्यश्री चिदानंद सरस्वती, परमार्थ निकेतन आश्रम
- श्री नम्रमुनी महाराज, जैन मुनी, संस्थापक - पारस धाम
- धीरेंद्रकुमार गर्ग, गुरु, बागेश्वर धाम
- बाबा रामदेव, योगगुरू
- स्वामी रामभद्राचार्य
- स्वामी कैलाशानंद, महामंडलेश्वर, निरंजनी आखाडा
- अवदेशानंद गिरी, महामंडलेश्वर, जुना आखाडा
- श्री देवकीनंदन ठाकुरजी महाराज, विश्वशांती सेवा ट्रस्ट
- दीदी माता साध्वी ऋतंभरा जी, वात्सल्य ग्रा
- स्वामी परमात्मानद जी, संस्थापक, परम शक्तीपीठ
- श्री विशाल राकेश जी गोस्वामी, मुख्य पुजारी, श्रीनाथजी मंदिर
जागतिक व्यासपीठावर भारताची वाढती प्रतिष्ठा..
अनंत आणि राधिका अंबानीच्या या लग्नाच आध्यात्मिक गुरूंची उपस्थिती, वैदिक मंत्र आणि विधी यामुळे हा लग्नसोहळा खास ठरला, सोबतच भारताच्या प्राचीन ज्ञानाचा आध्यात्मिक उत्सव बनला. जागतिक नेते, उद्योगपती आणि सांस्कृतिक व्यक्तींच्या उपस्थितीमुळे या विवाहाची शान आणखीनच वाढली, या सोबतच जागतिक राजकीय व्यक्ती आणि व्यावसायिक नेत्यांच्या उपस्थितीने या लग्नसोहळ्याला एखाद्या जागतिक एकतेचे स्वरूप प्राप्त झाले, ज्यामुळे जागतिक व्यासपीठावर भारताची वाढती प्रतिष्ठा अधोरेखित झाली.

आधुनिक भारताचे प्रतिबिंब, एक राष्ट्रीय अभिमानाचा क्षण!
अनंत आणि राधिका अंबानीच्या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जगाला एक शक्तिशाली संदेश दिला. आजचा भारत हा आत्मविश्वासू, आध्यात्मिक आणि जागतिक स्तरावर प्रशंसनीय आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अंबानी कुटुंबाने म्हटल्याप्रमाणे, "विविध क्षेत्रातील जागतिक मान्यवरांना या भव्य मेळाव्याला उपस्थिती लाभली, ज्यामुळे त्यांची भारतासोबत समावेशक आणि अर्थपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी अधोरेखित करते.' या शाही लग्नातील पाहुण्यांची यादी, आध्यात्मिक अनुनाद आणि इतक्या मोठ्या स्तरावरील हा कार्यक्रम ही गोष्ट स्पष्ट करते. हे केवळ लग्न नव्हते तर राष्ट्रीय अभिमानाचा क्षण होता. हा एक असा उत्सव होता जिथे भारताचा प्राचीन आत्मा त्याच्या जागतिक महत्त्वाकांक्षेला पूर्ण करत होता आणि संपूर्ण जग त्याचे साक्षीदार होते.
पाहुण्यांची उपस्थिती, आंतरराष्ट्रीय राजनैतिकतेची झलक
- जॉन केरी, अमेरिकन राजकारणी
- टोनी ब्लेअर, माजी ब्रिटिश पंतप्रधान
- बोरिस जॉन्सन, माजी ब्रिटिश पंतप्रधान
- मॅटेओ रेन्झी, इटलीचे माजी पंतप्रधान
- सेबास्टियन कुर्झ, ऑस्ट्रियाचे माजी पंतप्रधान
- स्टीफन हार्पर, कॅनडाचे माजी पंतप्रधान
- कार्ल बिल्ड्ट, स्वीडनचे माजी पंतप्रधान
- मोहम्मद नाशीद, मालदीवचे माजी अध्यक्ष
- महामहिम सामिया सुलुहू हसन, टांझानियाचे अध्यक्ष
जागतिक व्यावसायिक जगतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती
- अमीन नासेर, अध्यक्ष आणि सीईओ, अरामको
- महामहिम. खलदून अल मुबारक, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, मुबाडाला
- मरे ऑचिनक्लॉस, सीईओ, बीपी
- रॉबर्ट डडली, माजी सीईओ - बीपी, बोर्ड सदस्य - अरामको
- मार्क टकर, ग्रुप चेअरमन, एचएसबीसी होल्डिंग्ज
- बर्नार्ड लूनी, माजी सीईओ, बीपी
- शांतनु नारायण, सीईओ, अॅडोब
- मायकल ग्रिम्स, व्यवस्थापकीय संचालक, मॉर्गन स्टॅनली
- इगोर सेचिन, सीईओ, रोसनेफ्ट
- जे ली, कार्यकारी अध्यक्ष, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स
- दिल्हान पिल्ले, सीईओ, टेमासेक होल्डिंग्ज
- एम्मा वॉल्मस्ली, सीईओ, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन
- डेव्हिड कॉन्स्टेबल, सीईओ, फ्लोर कॉर्पोरेशन
- जिम टीग, सीईओ, एंटरप्राइझ जीपी
- गियानी इन्फँटिनो, आयओसी सदस्य, फिफाचे अध्यक्ष
- जुआन अँटोनियो समरंच, उपाध्यक्ष, आयओसी
- न्गोजी ओकोंजो-इवाला, महासंचालक, डब्ल्यूटीओ
- दिनेश पालीवाल, भागीदार, KKR
- लिम चाउ किआट, सीईओ, जीआयसी
- मायकेल क्लेन, व्यवस्थापकीय भागीदार, एम. क्लेन अँड कंपनी
- बादर मोहम्मद अल-साद, संचालक, केआयए
- योशिहिरो हयाकुटोम, वरिष्ठ व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी, एसएमबीसी
- खलील मोहम्मद शरीफ फौलाथी, उपाध्यक्ष, एडीआयए
- पीटर डायमंडिस, कार्यकारी अध्यक्ष, सिंग्युलॅरिटी युनिव्हर्सिटी
- जेम्स टायक्लेट, सीईओ, लॉकहीड मार्टिन
- एरिक कॅन्टर, उपाध्यक्ष, मोएलिस अँड कंपनी
- एनरिक लोरेस, अध्यक्ष आणि सीईओ, एचपी इंक.
- बोर्जे एखोल्म, अध्यक्ष आणि सीईओ, एरिक्सन
- विल्यम लिन, कार्यकारी उपाध्यक्ष, बीपी
- टॉमी उइटो, अध्यक्ष, नोकिया मोबाइल नेटवर्क्स


















