Amrapali Gan : OnlyFansच्या नव्या CEO भारतीय वंशाच्या 36 वर्षीय आम्रपाली गन
Amrapali Gan New CEO of OnlyFans : मुंबईत जन्मलेल्या 36 वर्षीय आम्रपाली गन यांची OnlyFansच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : जगभरातील मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची वर्णी लागत असताना आता त्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. सबस्क्रिप्शन आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या OnlyFansच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या आम्रपाली गन (Amrapali Gan) यांची निवड करण्यात आली आहे. आम्रपाली गन यांचा जन्म मुंबईत झाला असून त्या केवळ 36 वर्षांच्या आहेत. कंपनीचे संस्थापक टिम स्टोकली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्रपाली गन यांची निवड करण्यात आली आहे. आम्रपाली गन यांची 21 डिसेंबरपासून या पदावर निवड झाल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
आम्रपाली गन यांनी या आधी ओन्लीफॅन्स (OnlyFans) या कंपनीत मार्केटिंग आणि कम्युनिकेशन या विभागाच्या प्रमुखपदी काम केलं आहे. त्या आम्रपाली गन यांनी यापूर्वी रेड बुल आणि क्वेस्ट न्युट्रिशन या कंपन्यांमध्ये मोठी पदं सांभाळली आहेत.
टिम स्टोकली यांनी 2016 साली OnlyFans या सबस्क्रिप्शन आधारित असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती. टिम स्टोकली यांनी आपला पदभार आम्रपाली गन यांना सोपवताना म्हटलं आहे की, आम्रपाली या कंपनीच्या सहकारी आणि चांगल्या मैत्रिण आहेत. त्यांच्या नेतृत्वात कंपनी चांगली प्रगती करेल असा विश्वास आहे.
आम्रपाली गन यांचे शिक्षण हॉवर्ड बिजनेस स्कुलमधून झालं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हरसिटीमधून पब्लिक रिलेशन अॅन्ड ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी एफआयडीएम या संस्थेतून मर्केन्टाईज मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
आम्रपाली गन यांची कारकीर्द
- OnlyFans च्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन या विभागाच्या प्रमुखपदी काम
- कॅनिबिज कॅफे कंपनीच्या मार्केटिंग आणि पब्लिसिटी विभागाच्या उपाध्यक्षा
- लोवेल हर्ब को. या कंपनीच्या डायरेक्टर कम्युनिकेशन
- रेड बुल मीडिया हाऊसच्या ब्रॅंड अॅक्टिव्हेशन आणि कम्युनिकेशन मॅनेंजर
- क्विस्ट न्युट्रिशन डायरेक्टर आणि ब्रँड कम्युनिकेशनच्या प्रमुख
- स्टाईलसेंट च्या मार्केटिंग मॅनेंजर
- पेप्सिकोच्या मार्केटिंग लिडरशिफ प्रोग्रॅमच्या प्रमुख
महत्त्वाच्या बातम्या :