एक्स्प्लोर
भाजपाची सत्ता आल्यास अमित शाह यूपीचे मुख्यमंत्री?
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेचा निकाल 11 मार्चला लागणार आहे. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नवीन सरकार स्थापनेबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत.
समाजवादी पार्टी आणि बसपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार स्पष्ट आहेत. मात्र भाजपने अजून कोणत्याही चेहऱ्याचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे अनेक नावांबाबत चर्चा सुरु आहे.
नवीन चेहऱ्याला संधी?
मुख्यमंत्रीपदासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, उमा भारती आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचीही चर्चा आहे.
पक्षातील वरिष्ठ नेते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित करणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून विविध राज्यात भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिलेला पाहता नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
2019 च्या निवडणुकांसाठी अमित शाहांची मुख्यमंत्रीपदी वर्णी?
भाजपची बहुमताने सत्ता आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पद्धतीने काम करुन घेता यावं, यासाठी नवीन चेहरा दिला जाऊ शकतो. मात्र इतर पक्षाची मदत घ्यावी लागल्यास वरिष्ठ नेता म्हणून राजनाथ सिंह मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असतील, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
भाजपला बहुमत मिळाल्यास अमित शाहांचीही मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुका पाहता पंतप्रधान मोदी हा निर्णय घेऊ शकतात. बहुमत आल्यास योगी आदित्यनाथ यांचं नाव शर्यतीत नसेल, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement