एक्स्प्लोर
असा असेल गृहमंत्री अमित शाह यांचा पहिला जम्मू-काश्मीर दौरा
दौऱ्यादरम्यान अमित शाह यांचा मुक्काम श्रीनगरच्या राजभवनात असणार आहे. तर पंचायत सदस्यांशीही चर्चा करतील. तसेच फुटीरतावाद्यांविरोधात कडक भूमिका घेणार असल्याचंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यात ते अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधी गोष्टींचा आढावा घेतली. अमित शाहा या दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. तसेच फुटीरतावाद्यांविरोधात कडक भूमिका घेणार असल्याचंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
दौऱ्यादरम्यान अमित शाह यांचा मुक्काम श्रीनगरच्या राजभवनात असणार आहे. तर पंचायत सदस्यांशीही चर्चा करतील. शिवाय, शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेण्याचीही शक्यता आहे. उद्या सकाळी अमित शाह अमरनाथचं दर्शन घेतील.
VIDEO | गृहमंत्री अमित शाह काश्मीर दौऱ्यावर | एबीपी माझा
फुटीरतावाद्यांविरोधात केंद्र सरकार कडक भूमिका घेणार
जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी केंद्र सरकार कोणतीही तडजोड करणार नाही आहे. गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने फुटीरतावाद्यांच्या अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. आज पर्यंत जे होतं आलं, ते आता होणार नाही असं स्पष्ट मतं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे.
BJP Meet | विधानसभेलाही युती राहणार, पण मुख्यमंत्री भाजपचाच-अमित शहांचा कोअर कमिटीला कानमंत्र | ABP Majha
असा असेल अमित शाहांचा जम्मू-काश्मीर दौरा
- गृहमंत्री अमित शाह यांचा पहिला कश्मीर दौरा
- दुपारी 3 वाजता श्रीनगर विमानतळावर पोहाचणार
- श्रीनगर विमानतळावरुन बीएसएफच्या हेलीकॉप्टरने थेट राजभवनमध्ये
- राजभवनात अमरनाथ यात्रेच्या व्यवस्थेसंबंधी बैठक
- स्थानिक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी
- संध्याकाळी 6 वाजता भाजप पदाधिकारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या झालेल्या परिवाराशी नेहरु गेस्ट हाउसमध्ये भेट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement