एक्स्प्लोर

साखर उद्योगाची 35 वर्षांची डोकेदुखी अमित शाहांकडून निकाली, साडेनऊ हजार कोटींचा प्राप्तीकर माफ

केंद्राच्या या निर्णयामुळे वसुलीच्या नोटीसींपासून कारखानदारांना दिलासा मिळणार आहे. तसेच राज्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 

नवी दिल्ली : केंद्रात सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अमित शाहांनी साखर उद्योगासाठी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जो प्रश्न गेल्या 35 वर्षांपासून साखर उद्योगाची डोकेदुखी बनला होता तो प्राप्तिकर आकारणीचा मुद्दा आता निकालात निघाला आहे. एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला म्हणून त्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडे नऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर केंद्र सरकारनं एका झटक्यात रद्द केला आहे. राज्यातल्या जवळपास शंभर साखर कारखान्यांना आणि पर्यायानं 40 लाख उस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यामुळे दिलासा मिळेल. 

देशातल्या सहकारी साखर कारखान्यांवर हे दावे 1985-86 पासून प्रलंबित होते. अनेक कारखान्यांना वसुलीच्या नोटीसाही प्राप्त झाल्यानं कारखानदारांमध्ये नाराजीचंही वातावरण होतं. आता केंद्राच्या या निर्णयामुळे वसुलीच्या नोटीसींपासून कारखानदारांना दिलासा मिळणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे यांच्या शिष्टमंडळानं अमित शाहांची या प्रश्नावर भेट घेतली होती. त्यानंतर सीबीडीटीने एक नोटफिकेशन काढून प्राप्तिकर आकारणीचा निर्णय मागे घेतला. पण या नोटिफिकेशनमुळे केवळ 2016 नंतरच्या प्राप्तिकाराचा मुद्दा मार्गी लागला होता. 

त्या आधीच्या कराबाबत जी साशंकता होती तीही आता या नव्या निर्णयामुळे दूर झालेली आहे. नव्या निर्णयामुळे एफआरपीपेक्षा जादा दर देणं हा नफा नव्हे तर व्यावसायिक खर्च गृहीत धरला जाणार आहे. याच आधारे प्राप्तिकराचे दावे निकालात काढण्याची सूचना या परिपत्रकात आहे. त्यामुळे देशभरातील सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळेल असं या उद्योगातले तज्ज्ञ सांगत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला

व्हिडीओ

Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा
Pune Viral Appa : अप्पाचा विषय लय हार्ड है, सोशल मीडियावर धुमाकळू घालणारे आजोबा 'माझा'वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Chhagan Bhujbal: महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही छगन भुजबळ सहीसलामत सुटले; निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही छगन भुजबळ सहीसलामत सुटले; निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर
Embed widget