एक्स्प्लोर
भारतीय लष्कराच्या ताफ्यात नव्या M-777 तोफा दाखल
नवी दिल्ली : भारतीय लष्करासाठी अमेरिकन बनावटीच्या M-777 तोफा आज भारतात दाखल झाल्या. तब्बल 30 वर्षांनंतर लष्कराच्या ताफ्यात अशाप्रकारच्या परदेशी बनावटीच्या तोफा दाखल झाल्या आहेत.
80 च्या दशकात भारतीय सैन्यदलात स्वीडनच्या बोफर्स तोफा दाखल झाल्या. पण या तोफा खरेदीतील दलालीच्या आरोपांमुळे यानंतर तोफा खरेदी करण्यात आल्या नव्हत्या. पण आता अमेरिकन बनावटीच्या M-777 या नव्या तोफा सैन्य दलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने, सैन्य दलाची ताकद वाढली आहे.
आज दुपारी 2 च्या सुमारास या नव्या तोफा राजधानी दिल्लीत दाखल झाल्या. कस्टम विभागाच्या कार्यवाहीनंतर या तोफा दिल्ली कॅन्टहून राजस्थानच्या पोखरण फायरिंग रेंजकडे पाठवण्यात आल्या. या तोफा पोखरणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यातून मारा करुन तपासणी केली जाईल.
या तोफांची निर्मिती अमेरिकेच्या BSE सिस्टिम कंपनीनं केली आहे. या तोफा भारतात दाखल झाल्यानंतर 145 M-777 अल्ट्रा लाईट हेवित्झरच्या करारानुसार, दोन तोफा वेळेअधीच भारतीय सैन्य दलाला पुरवल्याचं कंपननीनं स्पष्ट केलं. तसेच भारतीय सैन्य दलाचं आर्टिलरी गनच्या माध्यमातून अत्याधुनिकरण करण्यास आवश्यक ते सर्व सहकार्य करु असंही कंपनीनं यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, भारताने गेल्या वर्षीच अमेरिकेच्या BSE कंपनीसोबत तोफांच्या खरेदीसाठी करार केला होता. या करारानुसार,155x 39 क्षमतेच्या 25 तोफा कंपनी भारताला अमेरिकेतून पुरवण्यात येणार आहेत. तर 120 तोफा भारतात असेम्बल करण्यात येणार आहेत. या व्यवहारासाठी भारताने BSE ला 2900 कोटी रुपये दिले आहेत.
या 120 तोफा असेम्बल करण्यासाठी BSE ने महिंद्रा कंपनीशी करार केला आहे. या तोफांची क्षमता 24 ते 40 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बीड
बीड
बीड
Advertisement