PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला 'एनडीए'चा अर्थ, विरोधकांच्या 'इंडिया'वरही हल्लाबोल
NDA Meeting Delhi : एनडीए विरोधात असताना सरकारचा विरोध केला. घोटाळे बाहेर काढले पण आम्ही लोकभावनेचा अनादर केला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
NDA Meeting in Delhi PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये 'एनडीए'तील मित्रपक्षांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या 'इंडिया'वर हल्लाबोल केला. त्याशिवाय एनडीएचा अर्थही सांगितला. विकास हेच आपले एकमेव लक्ष्य असल्याचेही सांगितले. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशभरातील एनडीएचे सर्वच घटकपक्ष या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. 2014 पासून देशात केलेल्या विकासकामाची माहिती दिली. त्याशिवाय पुढील 25 वर्षांसाठी देशाच्या विकासाचे प्लॅनिंग केल्याचे सांगितले.
पंतप्रधानांचा विरोधकांच्या एकीवर हल्लाबोल -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या एकीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, युती भ्रष्ट्रचारावर आधारित असेल तर देशाला नुकसान होते. जेव्हा सत्तेच्या लालसेमुळे युती केली जाते, जेव्हा भ्रष्टाचाराच्या उद्देशाने युती केली जाते, जेव्हा युती कुटुंबवादाच्या धोरणावर आधारित असते, जेव्हा जातीवाद आणि प्रादेशिकता लक्षात घेऊन युती केली जाते, मग त्या युतीमुळे देशाचे मोठे नुकसान होते. आम्ही कधीच नकारात्मक राजकारण केले नाही. विरोधात असतानाही एनडीएची भूमिका सकारात्मक होती. एनडीए विरोधात असताना सरकारचा विरोध केला. घोटाळे बाहेर काढले पण आम्ही लोकभावनेचा अनादर केला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेसवर हल्लाबोल -
पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशात राजकीय आघाड्यांची प्रदीर्घ परंपरा आहे, परंतु नकारात्मकतेने झालेली कोणतीही युती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. काँग्रेसने 90 च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी आघाडीचा वापर केला. काँग्रेसने सरकारे स्थापन करून सरकारे बिघडवली.
2014 पूर्वीच्या आघाडी सरकारचे उदाहरण आपल्यासमोर आहे. पंतप्रधानांवरील हायकमांड, पॉलिसी पॅरालिसिस, निर्णय घेण्यास असमर्थता, अव्यवस्था आणि अविश्वास, भांडणे आणि भ्रष्टाचार, लाखो-कोटींचे घोटाळे झाले आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'यूपीए' सरकारवर टीकास्त्र सोडले.
कोरोनाच्या काळात राजकारण केले नाही -
विरोधकांचे आघाडी मिशन मजबुरी म्हणून आहे. ते स्वार्थासाठी तत्वांशी तडजोड करत आहेत. आम्हाला नावे ठेवणं हेच विरोधकांचं एकमेव काम आहे. विरोधक आमचे प्रतिस्पर्धक आहेत, पण शत्रू नाहीत. आम्ही काँग्रेसच्या प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न दिला. कोरोनाच्या काळात राजकारण अथवा पक्षपात केला नाही. राज्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसमोबत संवाद साधला. बिगर भाजपशासीत राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबतही संवाद साधला. त्यांना मदत केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सर्वांचा एनडीएवर विश्वास -
एनडीएच्या 25 वर्षांच्या या प्रवासासोबत आणखी एक योगायोग जुळून आलाय. हीच ती वेळ आहे जेव्हा आपला देश पुढील 25 वर्षांत मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठी पावले उचलत आहे. हे ध्येय विकसित भारताचे, आत्मनिर्भर भारताचे आहे. आपण देशाच्या विकासासाठी काम करत आहोत. सर्वांचा 'एनडीए'वर विश्वास आहे. एनडीएमधील सर्व मित्रपक्षांचे स्वागत आहे.
मोदींनी सांगितला एनडीएचा अर्थ -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी एनडीएचा अर्थही सांगितला. ते म्हणाले की, एन म्हणजे न्यू इंडिया, (New India) डी म्हणजे डेव्हलप्ड नेशन (Developed Nation) आणि ए म्हणजे अॅस्पिरेशन ऑफ पीपल्स.. ( Aspiration of people) म्हणजेच लोकांच्या महत्वाकांक्षा होय. आज युवा, महिला, मध्यमवर्ग, दलित आणि वंचितांना एनडीएवर पूर्ण विश्वास आहे.
N means New India
— BJP (@BJP4India) July 18, 2023
D means Developed Nation
A means Aspiration of people
Today, the youth, women, middle class, Dalits and deprived trust the NDA.
- PM @narendramodi pic.twitter.com/9ORUU4MgsB
एनडीए देशातील लोकांना समर्पित आहे. एनडीएसाठी राष्ट्र पहिले आहे. देशाची सुरक्षा, प्रगती आणि लोकांचं सशक्तीकरण आधी आहे. एनडीए हा अटलजींचा आणखी एक वारसा आहे, जो आपल्याला बांधून ठेवतो. एनडीएच्या स्थापनेत अडवाणीजींनीही महत्त्वाची भूमिका बजावली आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.
1998 मध्ये एनडीएची स्थापना झाली. पण फक्त सरकार स्थापन करणे आणि सत्ता मिळवणे हा एनडीएचे लक्ष्य कधीच नव्हते. एनडीए कुणाच्या विरोधात तयार झाले नव्हते, एनडीए कुणाला सत्तेतून काढण्यासाठी स्थापन झाले नव्हते. एनडीएची स्थापना देशात स्थिरता आणण्यासाठी झाली होती.
भविष्य सुरक्षित करण्यासाठी काम -
आम्ही केवळ आजच्या गरजांसाठी काम करत नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचे भविष्यही सुरक्षित करत आहोत. आम्ही वारसा जपण्याबरोबरच विकास करत आहोत. आम्ही मेक इन इंडिया आणि पर्यावरणाच्या रक्षणावरही भर देत आहोत, आमचा हेतू स्पष्ट आहे, आमचे धोरण स्पष्ट आहे आणि आमचा निर्णय पक्का आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. राजकारणात स्पर्धा असू शकते पण शत्रुत्व नसते. पण आज विरोधकांकडे आमच्यावर टीका करण्याशिवाय काम नाही. आम्हाला शिवीगाळ, अपमानित केले. असे असतानाही आपण पक्षांच्या हितापेक्षा देशाला वर ठेवले आहे. एनडीए सरकारनेच काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना भारतरत्न दिले. मुलायमसिंह यादव, शरद पवार, गुलाम नबी आझाद अशा अनेक नेत्यांना आपण पद्म सन्मान दिला, असेही पंतप्रधान म्हणाले.
#WATCH | "In the third term of NDA, India will become the third largest economy," says Prime Minister Narendra Modi during addressing NDA Meeting in Delhi pic.twitter.com/UEh9XUC8sy
— ANI (@ANI) July 18, 2023