एक्स्प्लोर
2017च्या निवडणुकीतील बहुमतानंतर मुख्यमंत्र्याचा निर्णय : मुलायम
लखनौ : उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या घरात घमासान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गृहक्लेश मिटण्याची चर्चा असतानाच सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव म्हणाले की, "आज मुख्यमंत्री अखिलेश यादव आहेत. पण 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय घेतला जाईल."
यूपीत 'यादवी' : हकालपट्टी केलेल्या चारही मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये वापसी होणार
पत्रकार परिषदेला अखिलेख यांची दांडी! यूपीतील 'यादवी'च्या पार्श्वभूमीवर मुलायम सिंह यांनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुलायम यांचे बंधू आणि मंत्रपदावरुन हकालपट्टी झालेले शिवपाल यादव उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दांडी मारली. त्यामुळे पिता-पुत्रामुळे वाद मिटलेला नाही हे स्पष्ट आहे.गळाभेटीदरम्यानच अखिलेश-शिवपाल मंचावर भिडले
आमचं कुटुंब एक, पक्ष एक! आमचं कुटुंब एक आहे, पक्ष एक आहे, असं म्हणत मुलायम सिंह यांनी काही लोक कटकारस्थान रचत असल्याचा आरोप केला. मात्र जनतेचा त्यांच्यावर विश्वास नसल्याचंही ते म्हणाले.दिल्लीदूत : यादवांचं महाभारत…
रामगोपाल यादवांच्या वक्तव्यांवर दुर्लक्ष करतो : मुलायम याशिवाय रामगोपाल यादव यांच्या वक्तव्यांवर लक्ष देत नाही, त्यांची विधानं असंबद्ध आहेत, असंही मुलायम सिंह यांनी सांगितलं. मुलायम सिंह यांचे चुलत बंधू रामगोपाल यादव हे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात.यूपीत पुन्हा ‘यादवी’, सपा आज फुटणार?
मंत्र्यांना परत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा : मुलायम मंत्रीपदावरुन हकालपट्टी केलेल्या शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांच्या परतीचा निर्णय मुख्यमंत्री अखिलेश यादवच घेतील, असंही मुलायम सिंह यांनी स्पष्ट केलं.उत्तर प्रदेशमध्ये शिवपाल यादवांसहित चार मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement