एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजमेर स्फोट प्रकरण, असीमानंद यांची निर्दोष मुक्तता, 3 जण दोषी
नवी दिल्ली : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 2007 सालच्या अजमेर स्फोटाप्रकरणी तीन जणांना दोषी ठरवलं आहे. भावेश, देवेंद्र गुप्ता आणि सुनील जोशी यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
सुनील जोशीचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर स्वामी असीमानंद आणि चंद्रशेखर लेवे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील एकूण 9 आरोपींपैकी 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
काय आहे अजमेर स्फोट प्रकरण?
अजमेर शहरातील दर्ग्यात 11 ऑक्टोबर 2007 रोजी झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर 15 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास राजस्थान एटीएसने सुरु केल्यानंतर 2010 साली देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा आणि चंद्रशेखर लेवे यांना अटक करण्यात आली होती. पुढे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाची धुरा सोपवण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement