एक्स्प्लोर

Delhi Pollution: दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली, अनेक भागात AQI 400 पार; दोन दिवस शाळाही बंद राहणार

Delhi Air Quality Index: दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जेव्हा हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचते तेव्हा GRAP चा तिसरा टप्पा लागू केला जातो.

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. ज्यामुळे फेज्ड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) चा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. अनेक भागात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (AQI) 400 चा टप्पा ओलांडला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 402 होता. त्याचवेळी दिल्लीत दिवसा अशी परिस्थिती होती की धुक्यामुळे सूर्य लपला होता.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाळा या पुढील दोन दिवस बंद राहणार आहेत. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं की, "वाढत्या प्रदूषणाच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक शाळा पुढील 2 दिवस बंद राहतील. प्रतिकूल हवामान आणि शेतात आग लावणे  हे दिल्लीतील प्रदूषण वाढण्याचे कारण मानले जात आहे. लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्याचवेळी शास्त्रज्ञांनी येत्या दोन आठवड्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे.

दिल्लीतील 'या' भागात हवेची गुणवत्ता गंभीर 

गुरुवारी दिल्लीतील अनेक भागात हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आली. यापैकी पंजाबी बागेत AQI 439, द्वारका सेक्टर-8 मध्ये 420, जहांगीरपुरीमध्ये 403, रोहिणीमध्ये 422, नरेलामध्ये 422, वजीरपूरमध्ये 406, बवानामध्ये 432, मुंडकामध्ये 439, आनंद विहारमध्ये 452 आणि आनंद विहारमध्ये 452 अशी नोंद करण्यात आली आहे. 

आठवडाभर दिल्लीचा AQI कसा होता?

दिल्लीचा AQI दिवसा 3 वाजता 378 वर पोहोचला होता. त्याच वेळी, 24 तासांची सरासरी AQI बुधवारी 364, मंगळवारी 359, सोमवारी 347, रविवारी 325, शनिवारी 304 आणि शुक्रवारी 261 नोंदवण्यात आली.

याआधी दिल्लीत प्रदूषण केव्हा झाले?

सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्‍टोबर 2023 मधील दिल्लीतील हवेची गुणवत्ता 2020 नंतर सर्वात वाईट होती. हवामान तज्ज्ञांनी पावसाचा अभाव हे त्याचे कारण मानले आहे. दिल्लीला अनेकवेळा प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याची गांभीर्यता लक्षात घेता, दिल्लीतील शाळा पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान सरकारकडून देखील दिल्लीतील प्रदूषण नियंंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येतात. तर यंदा सरकार यावर कोणत्या उपाययोजना करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा : 

ED Bribe Case : भ्रष्टाचाऱ्यांना घाम फोडणाऱ्या ईडीचा अधिकारीच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget