एक्स्प्लोर

Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान दुर्घटना: 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश, अपघाताची 4 संभाव्य कारणं!

Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात असेल.

Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये (Air India Plane Crash In Ahmedabad) एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते आहे. यात महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे. दरम्यान विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं. विमानाच्या टेकऑफनंतर 50 सेकंदांमध्ये हा भीषण अपघात झाला.

अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात असेल. टेक ऑफ नंतर आवश्यक उंचीवर विमान जात नाहीय हे वैमानिक सुमीत सभरवाल यांच्या लक्षात आल, त्यांनी 'मे-डे कॉल' केला, म्हणजे विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला. पण कोणतीही मदत मिळण्याच्या आत सगळा खेळ अवघ्या 50 सेकंदात संपला. विमानाचा अपघात नेमका का झाला?, याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेची चार संभाव्य कारणं व्यक्त केली जात आहे.

एअर इंडिया विमान दुर्घटनेची चार संभाव्य कारणं-

1) विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा...

2) लँडिंग गियर टाकता आला नसावा, लँडिंग गियर वेग कमी करतो...

3) पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी...

4) टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत...

महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू-

महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे. मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल हे मुंबईत पवई इथले आहेत. क्रू मेंबर अपर्णा महाडिक गोरेगावच्या तर  साईनीता चक्रवर्ती जुहूच्या तर रहिवासी आहेत. क्रू मेंबर रोशन सोनघरे या डोंबिवलीकर आहेत. तर दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. मैथिली पाटील पनवेलजवळील न्हावा गावच्या आहेत. प्रवाशांपैकी आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. तर मयूर पाटील या रहिवाशाची अजून माहिती समजलेली नाही. तर यशा कामदार या नागपूरच्या आहेत. 

संबंधित बातमी:

Air India Plane Crash In Ahmedabad: एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला; नेमकं काय घडलं?, A टू Z समजणार!

Gujarat Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना, 5 मुद्द्यात समजून घ्या नेमकं काय घडलं? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Embed widget