Air India : एअर इंडिया प्रतिस्पर्धकांना देणार टक्कर! कंपनीने केली 'ही' मोठी घोषणा
Air India : भारतातील विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एअर इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे.
Air India : आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तगडी टक्कर देण्यासाठी भारतातील विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एअर इंडियाने (Air India Company) एक मोठी घोषणा केली आहे. या निर्णयानुसार कंपनी 15 महिन्यांत 30 नवीन विमाने आपल्या ताफ्यात समावेश करणार आहे. टाटाच्या हाती एअर इंडियाची सुत्रे आल्यानंतर हा कंपनीचा मोठा निर्णय आहे
एअर इंडियाची मोठी घोषणा
आपल्या प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धा देण्यासाथी भारतातील विमान वाहतुक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एअर इंडियाने मोठी घोषणा केली. निर्णयानुसार, कंपनीच्या ताफ्यात 15 महिन्यांनंतर 30 नवीन विमानांचा समावेश करण्यात आला आहे.
कंपनीने केला करार
एअरलाइनने पुढील 15 महिन्यांत पाच वाइड-बॉडी बोईंग विमाने आणि 25 बॉडी एअरबस विमाने समाविष्ट करण्यासाठी करार पत्रांवर स्वाक्षरी केली आहे. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'या नवीन विमानांमुळे एअरलाइनच्या ताफ्यात 25 टक्क्यांहून अधिक वाढ होईल. ही विमाने 2022 च्या अखेरीस कार्यरत होतील. ही नवीन विमाने एअर इंडियाचा पहिला मोठा विस्तार दर्शवितात, ज्यामध्ये 10 नॅरो बॉडी विमाने आणि सहा वाइड बॉडी विमाने यांचा समावेश आहे. टाटा समूहाने यावर्षी भारताचे अधिग्रहण केले होते. त्याच वेळी, भाड्याने घेतलेल्या विमानांमध्ये 21 Airbus A320 Neo, चार Airbus A321 Neo आणि पाच Boeing B777-200LR यांचा समावेश आहे.
विमान वाहतूक मध्ये भरभराट, 'या' पदांसाठी भरती
जानेवारीमध्ये टाटा समूहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यापासून, एअरलाइन्समध्ये सातत्याने अनेक मोठे बदल केले जात आहेत. एअरलाइन्सने आता मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा केली आहे. कंपनीकडून आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, पायलटसह अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. वरिष्ठ प्रशिक्षणार्थी पायलट, केबिन क्रू, कस्टम सर्व्हिस मॅनेजर व्हॉईस, सोल्यूशन आर्किटेक्ट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट हेड, कस्टमर सर्व्हिस मॅनेजर नॉन-व्हॉइस, रॅम्प ऑपरेशन सुपरवायझर या पदांसाठी रिक्त जागा आहेत. अशात कंपनीने असेही सांगितले आहे की, तुम्ही 18 सप्टेंबर 2022 पर्यंत एअर इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता.
'या' मार्गांवर धावतील एअर इंडियाची नवीन विमाने
एअर इंडियाच्या माहितीनुसार मुंबईतून सॅन फ्रान्सिस्को तसेच न्यूयॉर्क परिसरातील नेवार्क लिबर्टी आणि जॉन एफ केनेडी या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी उड्डाणे असतील, तर बंगळुरू ते सॅन फ्रान्सिस्कोसाठी आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा असेल. या विमानांसह, एअर इंडिया प्रथमच प्रीमियम इकॉनॉमी फ्लाइट्स ऑफर करेल. एअरलाइननुसार, B777-200LR डिसेंबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान ताफ्यात सामील होईल. ही विमाने भारतीय शहरांमधून यूएस फ्लाइटसाठी तैनात केली जातील.