Union Budget 2021 | ...म्हणून पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यानंतर ही बैठक घेण्यात येत आहे. सहसा अशी बैठक ही संसदीय सत्रांपूर्वी त्यांचा कारभार सुरळीतपणे व्हावा या उद्देशानं घेण्यात येते.
Union Budget 2021 राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. ज्यानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अहवाल सादर करण्यात आला. या धर्तीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. ज्यामध्ये केंद्राकडून पुढील दिवसांसाठीचे काही महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे सादर करण्यात येणार आहेत.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात येणार आहे. संसदेच्या दोन्ही सदनांतील सर्व पक्षांना या बैठकीची माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यानंतर ही बैठक घेण्यात येत आहे. सहसा अशी बैठक ही संसदीय सत्रांपूर्वी त्यांचा कारभार सुरळीतपणे व्हावा या उद्देशानं घेण्यात येते.
Delhi Blast | चालत्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी दूतावासासमोर एक पॅकेट फेकलं आणि....
बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
मागील बऱ्याच दिवसांपासून दिल्लीत सुरु असणारं कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी दिल्ली उसळलेला हिंसाचार या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. पण, आता यावर केंद्राकडून विरोधी पक्षांना नेमकं कोणतं उत्तर दिलं जाणार, मुळात हे मुद्दे बैठकीत चर्चेला वाव देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली असतानाच राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनीही रविवारी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी बैठकींची ही सत्र आणि त्याचे नेमके परिणाम काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंककल्प सादर करणार आहेत. कोरोना काळानंतर सादर केला जाणारा हा पहिलाच पेपरलेस अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना काळामुळं राज्यसभा आणि लोकसभेची सत्र ही प्रत्येकी पाच तासांमध्ये भरणार आहेत. राज्यसभेचं सत्र हे सकाळच्या वेळेत पार पडेल. तर, लोकसभेचं सत्र हे दुसऱ्या प्रहरी असेल.