एक्स्प्लोर

लेनिन, पेरियारनंतर श्यामा प्रसाद मुखर्जींच्या मूर्तीला काळं फासलं!

याआधी त्रिपुरामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता ब्लादिमीर लेनिन आणि तामिळनाडूमध्ये समाजसुधारक तसंच द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.

कोलकाता : त्रिपुरामध्ये लेनिनच्या पुतळ्याची नासधूस केल्याचे पडसाद तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही उमटले आहेत. कोलकातामधील कालीघाट परिसरात जनसंघांचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं. इतकंच नाही तर हा पुतळा उखडून टाकण्याचाही प्रयत्न झाला. कालीघाट परिसरातील केवायसी पार्कमध्ये असलेल्या या पुतळ्याला आज सकाळी आठच्या सुमारास काळं फासण्यात आलं. याआधी त्रिपुरामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता ब्लादिमीर लेनिन आणि तामिळनाडूमध्ये समाजसुधारक तसंच द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मूर्तीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी आतापर्यंत सहा तरुणांना अटक केली आहे. हे तरुण जादवपूर विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचं म्हटलं जात आहे. त्रिपुरात भाजप कार्यकर्त्यांचा राडा, लेनिनचा पुतळा बुलडोझरने तोडला! दुसरीकडे तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटना दुर्दैवी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. "मूर्तींच्या सुरक्षेवर लक्ष द्या, तसंच अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावलं उचला," असा आदेश मोदींनी दिल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. "दरम्यान केंद्रातील भाजप सरकार सर्व विचारधारा सामावून घेणारं आहे. त्यामुळे त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याच्या घटनेचं आम्ही समर्थन करत नाही," असं अमित शाह यांनीही स्पष्ट केलं आहे. कोण होते शामाप्रसाद मुखर्जी? - भारतीय जनसंघाचे संस्थापक - 6 जुलै 1901 मध्ये कोलकात्यात जन्म - 1929 मध्ये राजकीय प्रवासाला सुरुवात - 1947 नेहरुंच्या कॅबिनेटमध्ये होते - 1950 मध्ये कॅबिनेटमधून बाहेर पडले - 1951 मध्ये गोळवलकरांच्या सांगण्यावरुन - भारतीय जनसंघाची स्थापना केली - 1952 निवडणुकीत जनसंघाचे 3 खासदार जिंकले - अखंड भारत आणि संपूर्ण काश्मीरचा भारतात विलय, याचे पुरस्कर्ते

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget