एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अलाहाबाद, फैजाबादनंतर आता अहमदाबाद?
उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहराचे प्रयागराज असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर युपीमधील फैजाबाद शहराचे अयोध्या असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर आता गुजरातमधील अहमदाबादचा नंबर आहे.
अहमदाबाद : उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहराचे प्रयागराज असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर युपीमधील फैजाबाद शहराचे अयोध्या असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर आता गुजरातमधील अहमदाबादचा नंबर आहे. आता अहमदाबादच्या नामकरणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. गुजरात सरकार अहमदाबादचे नाव बदलण्याच्या तयारीत आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता अहमदाबादचे नाव मागणीनुसार 'कर्णावती' होऊ शकते.
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल याबाबत म्हणाले की, ''अहमदाबादचे नाव बदलून 'कर्णावती' करावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही आणि नागरिकांनी सहकार्य केले तर गुजरात सरकार अहमदाबादचे नाव बदलून 'कर्णावती' ठेवू शकते''.
काय आहे अहमदाबादचा इतिहास
आताचे अहमदाबाद आणि आसपासचा परिसर चालुक्य काळात वसवलेला आहे. ११ व्या शतकात वसलेल्या या शहराला अशवाल या नावाने ओळखले जात होते. चालुक्य घराण्याचा राजा कर्णने अशवालच्या भिल्ल राजाचा पराभव केला. त्यानंतर जवळच असलेल्या साबरमती नदीच्या काठावर नव्याने शहर वसवले. या शहराचे नाव 'कर्णावती' असे होते. अहमद शाहने १४११ साली कर्णावती शहराजवळ आणखी एक शहर वसवले. त्याचे नाव अहमदाबाद ठेवले. असे म्हटले जाते की, अहमदशाहने स्वतःच्या नावावरून या वसवलेल्या शहराला अहमदाबाद असे नाव दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement