एक्स्प्लोर

तालिबानने भारतासोबतचा व्यापार थांबवला, साखर आणि केळी उद्योगाला फटका

तालिबानी निर्णयाचा दुसरा फटका सोलापूर जिल्ह्यातील केळी व्यवसायाला बसला असून अफगाणिस्तानला जाणारे जवळपास 500  कंटेनरची निर्यात आता बंद होणार आहे.

मुंबई : अफगाणिस्थानमध्ये तालिबानी राजवट सुरु होताच त्यांनी आपले भारत द्वेषाचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतातून होणाऱ्या साखर आणि केळी निर्यातीला मोठा फटका बसू लागला आहे . भारताशी कोणत्याही प्रकारची आयात अथवा निर्यात केली जाणार नसल्याचे तालिबानीकडून जाहीर करण्यात आल्याने आता दरवर्षी 10 ते 12 लाख टन पांढरी साखर निर्यात करणारा साखर उद्योग अडचणीत आलेला आहे.

 सध्या साखरेच्या अतिरिक्त उत्पन्नामुळे देशांतर्गत बाजारातही साखरेचे भाव पडलेले असताना अचानक अफगाणिस्तानमधील निर्यात बंद होणार असल्याने साखर उद्योगाला 3 हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे . भारतात तयार होणाऱ्या धेडगुजरी अर्थात पांढऱ्या साखरेला श्रीलंका, अफगाण आणि इतर काही देशात मागणी असते . यात अफगाणिस्तान हे भारतातील साखर खरेदी करणारा मोठा खरेदीदार होता. आता तालिबानी निर्णयाचा फटका एका बाजूला साखर उद्योगाला बसला असला तरी आता दुसरी सुवर्णसंधी चालून आली असून आता कच्ची साखर निर्यातीसाठी राष्ट्रीय साखर महासंघाने कच्ची साखर निर्यातीच्या रूपाने एक मोठी वाट तयार करून दिली आहे. यंदा अजून हंगाम सुरु झाला नसला तरी सुरुवातीला कच्ची साखर बनवून ती निर्यात करण्यासाठी ऑर्डर घेण्याच्या सूचना महासंघाने जुलै मध्येच देशातील कारखान्यांना दिल्याने कमी उत्पादन खर्चात 3150 रुपये दराने 8 लाख टन कच्या साखरेचे करार आत्तापर्यंत झाले आहेत.

 यंदा कच्च्या साखरेचे किंग अशी ओळख असलेल्या ब्राझिलमध्ये दुष्काळ असून थायलंड मध्येही उत्पादन कमी झाल्याने भारताला कच्ची साखर निर्यात करण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे.  कच्ची साखर बनवताना वाफेची आणि इतर बचतीमुळे प्रक्रिया खर्चात प्रति क्विंटल 200 रुपयांची बचत होऊ शकणार आहे. यातच पांढऱ्या साखरेपेक्षा कच्च्या साखरेला दरही जास्त मिळणार असल्याने डिसेंबर पर्यंत पहिल्यांदा कच्च्या साखरेचे करार करून ती तातडीने निर्यात करावी अशा सूचना राष्ट्रीय साखर महासंघाने दिल्या असल्याचे प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.

 अफगाणिस्तानातील साखर निर्यात बंद झाल्याचा मोठा फटका भारताला बसला असला तरी कच्च्या साखर निर्यातीची आलेल्या सुवर्ण संधीमुळे साखर उद्योग यातून सावरू शकणार आहे. साखर महासंघाच्या भूमिकेचा फार मोठा फायदा खाजगी सोबत सहकारी साखर कारखान्यांना होणार असून आम्ही खाजगी कारखानेही कच्च्या साखर निर्यातीसाठी ऑर्डर घेऊ लागल्याचे खाजगी साखर कारखानदार अभिजित पाटील यांनी सांगितले. 

तालिबानी निर्णयाचा दुसरा फटका सोलापूर जिल्ह्यातील केळी व्यवसायाला बसला असून अफगाणिस्तानला जाणारे जवळपास 500  कंटेनरची निर्यात आता बंद होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 5 हजार टन  केळीची निर्यात इराण, ओमान , सौदी अरेबिया, दुबई आणि अफगाणिस्तान या आखाती देशात होत असते .  अफगाणिस्तानमध्ये सत्ताबदल होत असतानाही पाकिस्तानातील कराची बंदरात केळीचे शिप उतरल्यावर चमन बॉर्डर बंद केल्याने तुर्कम बॉर्डर मार्गे  अफगाणिस्तानात काबुल मध्ये पोचली होती . मात्र आता या मालाचे पैसे कसे मिळणार आणि या महिन्यातील तब्बल 15 कंटेनरच्या ऑर्डर रद्द झाल्याने पुढे काय हा प्रश्न केळी उत्पादकांच्या समोर उभा ठाकला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, माढा , माळशिरस या भागातून आखाती देशात महिन्याला 5 हजार टन एवढी केळी निर्यात होतात. अफगाण तालिबान संघर्षामुळे 15 रुपये दराच्या केळ्यांचा  भाव आता 10  रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचे महाराष्ट्र राज्य केळी बागायतदार संघाचे अध्यक्ष जाकीर मुलाणी यांनी सांगितले. आखाती देशात वर्षाला 500 कंटेनर पाठवणारे निर्यातदार किरण डोके याना आता पाठवलेल्या मालाच्या पैशाची काळजी लागून राहिली आहे . अफगाणिस्तानातील निर्यात बंद झाल्यानंतर इतर आखाती देशात निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने केली उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी निर्यातदार किरण डोके यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget