एक्स्प्लोर

"असा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नाही"; डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन नितीन गडकरींचं स्पष्टीकरण

Nitin Gadkari: डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन नितीन गडकरींनी आता ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. असा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नाही, असं ते म्हणाले आहेत.

Additional 10% GST Proposal on Diesel Vehicles: डिझेल वाहनांची (Diesel Vehicles) निर्मिती कंपन्यांनी कमी करावी, तसं न केल्यास केंद्राकडूनच डिझेल इंजिनवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी (GST) लावण्यात येईल, असा इशारा नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) दिल्याचं वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल होत होतं. पण आता स्वतः नितीन गडकरींनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. असा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नसल्याचं म्हणत नितीन गडकरींनी ते वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान, नितीन गडकरींचं वृत्त व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही पडल्याचं पाहायला मिळालं होतं. भारतीय शेअर बाजारतील ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड, आयशर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

नितीन गडकरींचं 'ते' वक्तव्य काय? 

दिल्लीत पार पडत असलेल्या 63 व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री नितीन गडकरींचं एक वक्तव्य सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आलं होतं. जर ऑटोमोबाईल कंपन्यांनी स्वतःहून डिझेल इंजिनचा वापर कमी केला नाही, तर डिझेल इंजिनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटीची शिफारस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना प्रत्यक्ष भेटत आणि पत्र लिहित करणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिल्याचं बोललं जात होतं. तसेच, अतिरिक्त जीएसटी प्रदूषण कराच्या स्वरुपात लावला जाणार असून सोबतच डिझेल वाहनांचं उत्पादन कमी करण्याची उद्योगांना विनंती, तसं न केल्यास केंद्राकडूनच डिझेल इंजिनवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचा इशाराही गडकरींनी यावेळी दिल्याचं बोललं जात होतं. परंतु, आपल्या याच व्हायरल होणाऱ्या वक्तव्यावर आता नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. 

नितीन गडकरींचं स्पष्टीकरण काय? 

रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "डिझेल वाहनांवरील विक्रीवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटीची रिफारस केल्याच्या मीडिया रिपोर्टवर तातडीनं स्पष्टीकरणाची गरज आहे. सरकारकडून सद्यस्थितीत असा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. 2070 पर्यंत कार्बन नेट झिरो गाठण्यासाठी आणि डिझेल सारख्या घातक इंधनामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी, तसेच ऑटोमोबाईल विक्रीतील झपाट्यानं वाढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेनुसार, स्वच्छ आणि ग्रीन पर्यायी इंधन सक्रियपणे स्वीकारणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच घातक प्रदूषण कमी करणं आणि त्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायी इंधन उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. तसेच, ही इंधनं स्वस्त, आणि पर्यावरणपूरक असणं आवश्यक आहे."

दरम्यान, दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी केलेलं डिझेल इंजिनावर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचं वक्तव्य समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालं. समाज माध्यमांमध्ये या वक्तव्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण समोर आलं. त्यांनी ट्वीट करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. पण नितीन गडकरींचं वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळाले होते. भारतीय शेअर बाजारतील ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड, आयशर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget