अभिनेत्री पूजा भटचाही 'भारत जोडो यात्रे'त सहभाग; हैदराबादमध्ये दिली राहुल गांधींना साथ
Pooja Bhatt Congress Bharat Jodo Yatra : अभिनेत्री पूजा भट्ट काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. हैदराबादमध्ये ती राहुल गांधींसोबत यात्रेत दिसली होती. सध्या सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
Pooja Bhatt Congress Bharat Jodo Yatra : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट (Pooja Bhatt) काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. सध्या ही यात्रा तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे पोहोचली असून या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पूजा भट्टही सामील झाली आहे. यादरम्यानचे, पूजा भट्टचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Actress-filmmaker Pooja Bhatt briefly joins the Congress party's Bharat Jodo Yatra. The Yatra resumed from Hyderabad city in Telangana this morning.
— ANI (@ANI) November 2, 2022
(Source: AICC) pic.twitter.com/eIBiFQaLXi
भारत जोडो यात्रेत सहभागी होणारी पूजा भट्ट पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी
भारत जोडो यात्रेत सामील होणारी पूजा भट्ट पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. अभिनेत्री पूजा भट्टनं यावेळी फुल स्लीव्हजचा काळ्या रंगाचा कुर्ता आणि प्रिंटेड स्टोल परिधान केला होता. पूजानं हात हलवून समर्थकांचं स्वागत केलं. यादरम्यान अभिनेत्रीला पाहण्यासाठी गर्दी झाला होती.
स्वरानं भास्करनं केलेलं राहुल गांधींचं कौतुक
यापूर्वी स्वरा भास्करनं राहुल गांधी आणि भारत जोडा यात्रेचं कौतुक केलं होतं. अभिनेत्रीनं ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, "निवडणुकीत पराभव, ट्रोलिंग, वैयक्तिक हल्ले आणि सतत टीका होत असतानाही राहुल गांधी ना तेढ वाढवणाऱ्या वक्तव्यांना बळी पडले, ना राजकारणाला बळी पडले. या देशाची स्थिती पाहता भारत जोडो यात्रेसारखा प्रयत्न कौतुकास्पद आहे."
तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी तेलंगणातील हैदराबाद येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. शहरातील वाहतूक पोलिसांनी मोर्चासंदर्भात वाहतूकीत बदल केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
भाजप आणि टीआरएस एकमेकांना मदत करतात, संपूर्ण काम पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर होते: राहुल गांधी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)