एक्स्प्लोर

भाजप आणि टीआरएस एकमेकांना मदत करतात, संपूर्ण काम पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर होते: राहुल गांधी

Rahul Gandhi On BJP-TRS: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा तेलंगणामध्ये दाखल झाली आहे.

Rahul Gandhi On BJP-TRS: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा तेलंगणामध्ये दाखल झाली आहे. मंगळवारी हैदराबादमध्ये (Hyderabad) राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, "आमची यात्रा प्रवास द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात आहे. भाजप-आरएसएस द्वेष पसरवण्याचे काम करतात. ते भावाला भावाशी लढवण्याचे काम करत आहेत. यामुळे देश कमजोर होत आहे, मजबूत नाही. कोणतीही शक्ती या यात्रेला रोखू शकत नाही. ही यात्रा हा भारताचा खरा आवाज आहे."

या सभेत व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, "मला वाटले की दिल्ली प्रदूषणात देशात पहिल्या क्रमांकावर आहे, पण हैदराबादमध्ये दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण आहे. लोकसभा आणि राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी टीआरएस भाजपला मदत करते."

केसीआर पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर काम करतात

भाजप आणि टीआरएसवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, "भाजप आणि टीआरएस एकत्र काम करतात. निवडणुकीपूर्वी ते फक्त नाटक करतात. मोदीजी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री फोनवर बोलतात. पंतप्रधानांच्या सांगण्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री काम करत आहेत. ते म्हणाले, मोदीजी देशाची राजधानी त्यांच्या मित्रांना विकत आहेत. केसीआर जमीन हडप करत आहेत, सिंचन प्रकल्पांचे पैसे हडप करत आहेत. पंतप्रधान आता सिलिंडर आणि पेट्रोल महागाईवर बोलत नाहीत.

याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी हैदराबादची ओळख असलेल्या चार मिनारसमोर तिरंगा फडकावला. सुमारे 32 वर्षांपूर्वी त्यांचे वडील आणि तत्कालीन पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांनीही याच ठिकाणाहून 'सद्भावना यात्रा' सुरू केली होती. राहुल गांधींनी राष्ट्रध्वज फडकावला तेव्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (TPCC) अध्यक्ष रेवंत रेड्डीही उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी दिवंगत राजीव गांधी यांना व्यासपीठावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस सक्रिय झाली आहे. मात्र या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत राहुल गांधी हे प्रचारासाठी उतरतील का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  

इतर महत्वाची बातमी: 

Bombay High Court : पोलिस स्टेशन गोपनीय कायद्यानुसार प्रतिबंधित ठिकाण नाही; पोलिस ठाण्यात व्हिडिओ शूट केल्याबद्दल दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Embed widget