VIDEO : पोलिसांच्या गाडीचं पेट्रोल संपलं तर कैद्यांनीच मारला गाडीला धक्का; बिहार पोलिसांच्या करामतीने सर्वच हैराण
Bihar Police News : बिहार सरकार दारूची तस्करी आणि विक्री थांबवण्यासाठी खूप पैसा खर्च करते पण तरीही लोक काही ऐकत नाहीत आणि छुप्या पद्धतीने दारू पितात. आता अशाच एका कारवाईदरम्यान बिहारमध्ये भन्नाट प्रकार घडला आहे.
India : सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कैदी पोलिसांच्या गाडीला धक्का देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ बिहारमधील (Bihar) असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक देखील आश्चर्यचकित झाले आणि बरेच जण या व्हिडीओवर विविध मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
चक्क कैद्यांनीच मारला पोलिसांच्या गाडीला धक्का
बिहारमध्ये दारूबंदी आहे. तिथे पोलीस दारू पिणाऱ्या लोकांना अटक करत असतात. बिहार सरकार दारूची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी खूप पैसा खर्च करते. दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवरही इथे योग्य ती कारवाई केली जाते. पण तरीही लोक ऐकत नाहीत आणि छुप्या पद्धतीने दारूचं सेवन करत असतात. बिहारमध्ये अशाच प्रकारे पकडलेल्या मद्यपींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते चक्क पोलिसांच्या गाडीला धक्का देताना दिसत आहेत.
पुलिस की गाड़ी और धक्का मारते क़ैदी।
— Anurag Chaddha (@AnuragChaddha) February 3, 2024
ये लिखने की ज़रूरत नहीं है कि दृश्य बिहार का है। 😀 #Bhagalpur pic.twitter.com/4GiJUY16JI
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हा व्हिडिओ बिहारमधील भागलपूर भागातील आहे, जिथे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने मिळून काही मद्यपींना अटक केली. मद्यपींना अटक केल्यानंतर पोलीस त्या कैद्यांना कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. दरम्यान, मधेच रस्त्यात पोलिसांच्या गाडीचं पेट्रोल संपलं आणि पोलिसांनी कैद्यांना कारमधून खाली उतरून गाडी ढकलण्यास सांगितलं. व्हिडिओमध्ये 4 कैदी एकत्र गाडीला धक्का देत असल्याचं दिसत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर टाकला, यानंतर बिहार पोलिसांवर बरीच टीका होत आहे.
लोक करत आहेत टीका
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करण्यात आला आहे. यात युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं - पोलिसांची कार कैदी ढकलत आहेत. हे दृश्य बिहारचं आहे, खरं तर हे लिहिण्याचीही गरज नाही. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिलं - बिहार नवशिक्यांसाठी नाही. एकाने लिहिलं - बिहार पोलीस भ्रष्ट आहेत. एकाने लिहिलं - हे सर्व तुम्हाला फक्त बिहारमध्येच मिळेल.
हेही वाचा:
Agra : एका मशेरीने मोडला संसार! पत्नी दिवसातून तीनदा मशेरी लावते म्हणून काढलं घराबाहेर