एक्स्प्लोर

ABP Southern Rising Summit : 'पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर इंडिया आघाडी तुटणार', बीआरएसचा दावा

ABP Southern Rising Summit : 'एबीपी न्यूज'च्या' द सदर्न रायझिंग समिट' या कार्यक्रमामध्ये बीआरएस पक्षाच्या नेत्या के. कविता यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला.

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर (Election) इंडिया आघाडी तुटणार असल्याचा दावा बीआरएस (BRS) पक्षाच्या नेत्या के. कविता (K. Kavita) यांनी केला आहे.  'एबीपी न्यूज'च्या (Abp News)  'द सदर्न रायझिंग समिट' कार्यक्रमामध्ये त्यांनी हा दावा केला आहे. एबीपी न्यूज द सदर्न रायझिंग समिट 2023 चे उद्घाटन गुरुवारी (12 ऑक्टोबर ) रोजी झाले. या समिटमध्ये व्यवसाय, राजकारण, चित्रपट, क्रीडा, विज्ञान आणि इतर क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकाच व्यासपीठावर आले. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यांमधील प्रगती, सांस्कृतिक समृद्धी या विषयांवर या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. 

काय म्हणाल्या के कविता ?

के कविता यांनी या व्यासपीठावर इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले की इंडिया आघाडी तुटेल. तर यावेळी त्यांनी बीआरएसविषयी देखील भाष्य केलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतीय राजकारणामध्ये कायमच तिसऱ्या खेळाडूचा उदय झाला आहे आणि तो तिसरा खेळाडू हा बीआरएस पक्ष आहे. दरम्यान 2024 निवडणुकांनंतर अन्नाद्रमुक हा पक्ष तुटु शकतो.' 

के कविता यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

बीआरएसच्या नेत्या के कविता यांनी यावेळी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'काँग्रेसने सत्तेत असताना कधीही जातीय जनगणना केली नाही. आता ते जातीय जनगणना करण्याची मागणी करत आहेत. पण राज्यात बीआरएस पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर जातीय जनगणना करण्यात येईल.' दरम्यान के कविता यांनी आतापर्यंत जातीय जनगणना का झाली असा सवाल भाजपला देखील विचारला आहे. 

काँग्रेसेच नेते के चिदंबरम यांचं प्रत्युत्तर

दरम्यान या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे नेते के चिदंबरम देखील उपस्थित होते. त्यांनी के कविता यांनी केलेला दाव्यावर उत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर मजबूत होईल. म्हणूनच इंडिया आघाडी कधीच तुटणार नाही.' आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांनी रणशिंगं फुंकलं आहे. त्यासाठी त्यांनी एकजूट केली असून त्यांच्या या एकजूटीला इंडिया आघाडी असं नाव देण्यात आलंय. तर या इंडियाच्या आघाडीवर बीआएस पक्षाकडून निशाणा साधण्यात आलाय.  

हेही वाचा : 

Retail Inflation Rate : सप्टेंबर महिन्यात महागाई नरमली, किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget