एक्स्प्लोर

ABP Cvoter Survey: मुख्यमंत्री योगी उत्तर प्रदेशात पुन्हा येणार! अखिलेश यादव-मायावती जिंकतील का? सर्वेक्षण डेटा वाचा

Cvoter Survey for UP Election 2022: उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येऊ शकते हे या सर्वेक्षणात स्पष्ट दिसत आहे. मात्र 2017 च्या तुलनेत जागा कमी होताना दिसत आहेत.

ABP Cvoter Survey for UP Election 2022: उत्तर प्रदेशात पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. सत्ताधारी भाजप, मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त छोट्या पक्षांनीही रॅली आणि कॉन्फरन्सद्वारे जनतेला आकर्षित करणे सुरू केले आहे. दरम्यान, एबीपी न्यूजसाठी सी व्होटर या सर्वेक्षण एजन्सीने यूपीच्या लोकांच्या मनाचा कल जाणून घेतला आहे.

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येऊ शकते असं या सर्वेक्षणात स्पष्ट दिसत आहे. मात्र, 2017 च्या तुलनेत जागा कमी होताना दिसत आहेत. पण सर्वेच्या आकडेवारीनुसार, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह सत्तेत परतू शकतो.

एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, जर आता विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपला 41 टक्के, सपाला 32 टक्के आणि बसपाला 15 टक्के मते मिळू शकतात. प्रियांका गांधी यांच्या प्रयत्नांना न जुमानता, काँग्रेस फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाही आणि पक्षाच्या खात्यात फक्त 6 टक्के मतांचा वाटा जात असल्याचे दिसते. त्याचबरोबर इतरांनाही 6 टक्के मते मिळू शकतात.

यूपीमध्ये कोणाला किती मतं?

एकूण सीट- 403

BJP+ 41%
SP+  32%
BSP-  15%
कांग्रेस- 6%
अन्य- 6%

उत्तर प्रदेशच्या सर्वेक्षणानुसार, जर मतांची टक्केवारी जागांमध्ये बदलली तर भाजपला 241-249 जागा, सपा 130-138, बसपाला 15-19 जागा मिळतील असे वाटते. तीन ते सात जागा काँग्रेसच्या खात्यात येऊ शकतात. तर इतरांना 0-4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

यूपीमध्ये कोणाकडे किती जागा आहेत?
एकूण सीट- 403

BJP+ 241-249
SP+ 130-138
BSP- 15-19
कांग्रेस- 3-7
अन्य- 0-4

टीप : पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाबसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक राज्यांमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. अशा वातावरणात, C VOTER ने abp न्यूजसाठी पाच निवडणूक राज्यांचा मूड जाणून घेतला आहे. या सर्वेक्षणात 98 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. हे सर्वेक्षण 4 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये त्रुटीचे मार्जिन प्लस मायनस तीन ते प्लस मायनस पाच टक्के आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget