ABP C-Voter Election Survey: योगींची लाट की बिकट वाट, यूपीमध्ये हवा कुणाची? सर्वात मोठा सर्व्हे
ABP C-Voter Election Survey : भाजपपासून काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, एमआयएम आदींनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
ABP C-Voter Election Survey : पुढील वर्षात उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकींच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, मात्र राजकीय नेत्यांच्या सभा-रॅली सुरु झाल्या आहेत. राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपपासून काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, एमआयएम आदींनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव सत्तेत परतण्याचा दावा करत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधीही उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत झाल्या आहेत. मायावतींनीही उत्तर प्रदेशमध्ये सत्तेचा दावा केलाय. भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पुन्हा एकदा राज्यात सत्ता काबिज करण्याचा निर्धार केलाय.
उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरणाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील जनतेचा कौल जाणून घेतला आहे. साप्ताहिक सर्व्हेच्या माध्यमातून एबीपीने मतदारांना उत्तर प्रदेशमध्ये कुणाचं सरकार येईल? असा प्रश्न विचारला होता. पाहा काय म्हणतोय सर्व्हे....
पक्ष | 20 नोव्हेंबर | 27 नोव्हेंबर | 6 डिसेंबर |
भाजप | 47% | 45% | 48% |
समाजवादी पार्टी | 29% | 30% | 29% |
भारतीय समाजवादी पार्टी | 8% | 8% | 9% |
काँग्रेस | 7% | 8% | 7% |
अन्य | 4% | 3% | 3% |
त्रिशंकु | 2% | 3% | 2% |
माहित नाही | 3% | 3% | 2% |
पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने आठवड्याचा सी वोटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील 11 हजार 85 जणांना सहभाग घेतला होता. हा सर्व्हे 25 नोव्हेंबर ते एक डिसेंबरदरम्यान घेण्यात आला होता. दरम्यान, वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : ABP-C Voter Survey : उत्तर प्रदेशमध्ये कुणाची सत्ता, कोण होणार मुख्यमंत्री? जाणून घ्या काय म्हणतोय सर्व्हे
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live