ABP-C Voter Survey : उत्तर प्रदेशमध्ये कुणाची सत्ता, कोण होणार मुख्यमंत्री? जाणून घ्या काय म्हणतोय सर्व्हे
Voter Survey : कोणत्या पक्षाकडे उत्तर प्रदेशची सत्ता जाईल? मुख्यमंत्रिपदी कोण बसणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ABP News C-Voter Survey : नव्या वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश हे प्रमुख राज्य मानलं जात आहे. उत्तर प्रदेशकडे सर्व पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. जानेवारीमधे होणाऱ्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. भाजपपासून काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, एमआयएम आदींनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय प्रादेशिक पक्षांनीदेखील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हे करत उत्तर प्रदेशमधील जनतेचा कौल जाणून घेतला आहे.
कोणत्या पक्षाकडे उत्तर प्रदेशची सत्ता जाईल? मुख्यमंत्रिपदी कोण बसणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून जनता स्वीकारेल का? की अन्य नेत्याला संधी मिळणार? याबाबतही सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत. पाहूयात सर्व्हेमध्ये काय माहिती समोर आली आहे...
मुख्यमंत्र्यासाठी कुणाला पसंती?
योगी आदित्यनाथ- 43%
अखिलेश यादव- 31%
मायावती- 15%
प्रियंका गांधी- 5%
जयंत चौधरी- 1%
अन्य- 5 %
आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाचा विजय होईल?
भाजप- 47%
एसपी- 29%
बीएसपी-8%
काँग्रेस- 7%
अन्य-4%
त्रिशंकु-2%
सांगू शकत नाही -3%
[नोट: एबीपी न्यूजने आठवड्याचा सी वोटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील सहा हजार 709 जणांना सहभाग घेतला होता. 11 ते 17 नोव्हेंबरदरम्यान हा सर्व्हे घेण्यात आलाहोता.]
वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये कोणाला किती जागा?
एकूण जागा- 403
भाजप+ : 213-221
समाजवादी+ : 152-160
बसपा : 16-20
काँग्रेस : 6-10
अन्य : 2-6
उत्तर प्रदेशात कोणाला किती टक्के मते?
एकूण जागा- 403
भाजप + : 41 टक्के
समाजवादी पक्ष + : 31 टक्के
बसपा : 15 टक्के
काँग्रेस : 9 टक्के
अन्य : 4 टक्के