एक्स्प्लोर
90 सेकंदात ईव्हीएम मशीन हॅक, आपकडून ईव्हीएम टेम्परिंगचा डेमो
नवी दिल्ली : भाजपच्या विजयात ईव्हीएमचा मोठा वाटा असल्याचा आरोप करणाऱ्या आम आदमी पार्टीनं आज विधानसभेत चक्क ईव्हीएम मशीनमध्ये घोळ घालणं शक्य असल्याचं दाखवून दिलं. आपचे आमदार आणि टेक्नोक्रॅट सौरभ भारद्वाज यांनी थेट ईव्हीएम मशीनमध्ये घोळ घालून दाखवला आहे. त्यामुळे आता ईव्हीएमवर केंद्रीय निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.
सौरभ भारद्वाज म्हणाले की, ईव्हीएमचा मदरबोर्ड हॅक करण्यासाठी केवळ 90 सेकंद लागतात. या 90 सेकंदात मशीन हॅक करुन निवडणुकीच्या निकालाचं चित्र बदलता येऊ शकतं. ज्या दिवशी मतदान सुरु होतं, त्याचवेळी कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी करायचा आहे हे निश्चित केलं जातं.
ईव्हीएम मशीनशी छेडछाडीचा डेमो सादर करताना भारद्वाज म्हणाले की, मतदानासाठी प्रत्येक पक्षाचा एक कोड असतो. आणि सिक्रेट कोडच्या माध्यमातून मतदार कोणालाही मतदान करु शकतात. पण या सिक्रेट कोडच्याच माध्यमातून ईव्हीएम मशीनशी छेडछाड केली जाते. असं त्यांनी यावेळी सांगितलं.
या डेमोवेळी भारद्वाज यांनी आम आदमी पक्षाच्या 'झाडू' चिन्हासमोरील बटन सर्वाधिकवेळा दाबलं. त्यानंतर ईव्हीएमवरील वेगवेगळी बटनं दाबून दाखवली. यात आपला 10 मतं आणि भाजपला 3 मतं मिळाली होती.
वास्तविक, यावेळी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 2-2 मतं आणि आपला 2 मतं दिली गेली होती. म्हणजे, सरळसरळ मशीन टेम्पर करुन सर्व मतं भाजपच्या खात्यात घालवली जाऊ शकतात हे यातून दाखवण्यात आलं. या डेमोच्या माध्यमातून भारद्वाज यांनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकीत अशाच प्रकारे मतदान झालं.
जर पूर्वीपासूनच भाजपला विजयी करायचं निश्चित केलं आहे. तर त्या पक्षाचा कोड मशीममध्ये टाकला. त्यानंतर मतदारानं कोणतंही बटन दाबल्यानंतर त्याचं मतं त्याच पार्टीच्या कोडमध्ये जाईल, ज्याच्याशी त्या बटन लिंक असेल. आणि सर्व मतं ही त्याच पक्ष आणि उमेदवाराला मिळतील.
विधानसभेतील आपल्या भाषणात सौरभ भारद्वाज यांनी भाजपनं गेल्या पाच वर्षात मशीन टेम्पर कसं करायचं हे शिकलं आहे. तर आपनं हेच काम तीन महिन्यात आत्मसात केलं आहे.
सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मशीन तयार करण्याचं काम सुरु आहे. हे सर्व मशीन तीन तासांसाठी आम आदमी पक्षाकडे द्यावीत, तर आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार विजयी होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement