एक्स्प्लोर
Advertisement
सासरच्यांनी 'ती' अट मोडल्याने वधूने मंडपात मोडलं लग्न
कानपूर : सासरी स्वच्छतागृहासारख्या किमान सुविधांचा अभाव असल्यामुळे कानपूरच्या एका वधूने भरमंडपातच लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. लग्नापूर्वी घरात शौचालय बांधण्याची अट सासरच्या मंडळींनी न पाळल्यामुळे तरुणीने हे पाऊल उचललं.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. घरात स्वच्छतागृह नसल्यास महिलांना उघड्यावर प्रातर्विधी करण्यासाठी जावं लागतं. डोक्यावरील पदर सरकल्यामुळे नव्हे, घरच्या सूनेला उघड्यावर शौचाला जावं लागल्याने घराण्याची नामुष्की होते, अशा आशयाच्या जनजागृती करणाऱ्या जाहिरातीही सध्या पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर नेहा नामक तरुणीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद म्हणावा लागेल.
नियोजित वराशी लग्न मोडलं असलं तरी मंडपातील एका विवाहोच्छुक तरुणाशी नेहाने लग्न केलं. या तरुणाच्या घरामध्ये स्वच्छतागृह आहे, हे विचारात घेऊनच त्याची निवड केल्याचं नेहा सांगते. कानपूरमध्ये एका स्थानिक एनजीओतर्फे आयोजित सामुहिक विवाहसोहळ्यामध्ये ती विवाहबद्ध झाली.
नेहाने उचललेलं हे पाऊल अनेक तरुणींसाठी आदर्श आणि प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement