Accident: भरधाव इको व्हॅन मागून ट्रकमध्ये घुसली, वडील आणि दोन मुलांसह 6 जणांचा अंत; दोन सख्ख्या भावांचाही जीव गेला, गॅस कटरने मृतदेह काढले, हात तुटून बोनेटवर
Accident: ही टक्कर इतकी भीषण होती की इको व्हॅनचा चक्काचूर झाला. पुढचा भाग चिरडला गेला. जखमी बराच वेळ अडकले होते, त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली

Yamuna Expressway Accident: मथुरा येथील यमुना एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या इको व्हॅनने मागून ट्रकला धडक दिली. या अपघातात वडील आणि दोन मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगी गंभीर आहेत. कारमधील सर्व प्रवासी दिल्लीहून आग्र्याला जात होते. शनिवारी पहाटे 3 वाजता बलदेव पोलिस स्टेशन परिसरात हा अपघात झाला.
गॅस कटरने कार कापून सर्वांना बाहेर काढले
ही टक्कर इतकी भीषण होती की इकोचा चक्काचूर झाला. कारचा पुढचा भाग चिरडला गेला. जखमी बराच वेळ अडकले होते, त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गॅस कटरने इको व्हॅन कापून सर्वांना बाहेर काढले. अपघातानंतरचे फोटोही समोर आले आहेत. यामध्ये मृतदेह आणि जखमी रस्त्यावर पडले होते. एका तरुणाचा मृतदेह पुढच्या सीटवर अडकला होता. त्याचे दोन्ही हात बोनेटवर आले होते. मृतांमध्ये दोन कुटुंबातील लोकांचा समावेश आहे. तर एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही. एक कुटुंब आग्रा येथील आहे तर दुसरे कुटुंब मध्य प्रदेशातील मुरेना येथील आहे. आग्राच्या हरलालपुरा येथील रहिवासी धर्मवीर, त्यांचे दोन्ही मुलगे रोहित आणि आर्यन यांचा मृत्यू झाला. तर धर्मवीरची पत्नी सोनी आणि मुलगी पायल यांची प्रकृती गंभीर आहे. मोरेना जिल्ह्यातील बधपुरा हुसेन गावातील दोन भाऊ दलवीर उर्फ छुल्ले आणि पारस तोमर यांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कुटुंबियांना माहिती दिली आहे.
VIDEO | Yamuna Expressway accident: Mathura SSP
— Press Trust of India (@PTI_News) July 19, 2025
Shlok Kumar says, "Two unfortunate accidents took place on Yamuna Expressway, one at about 2 am and another at 3 am. In the first accident, Eeco van which was travelling from Delhi to Agra, rammed into a heavy vehicle from behind.… pic.twitter.com/6jDVI0gKfG
एसएसपी म्हणाले, डुलकी आल्याने अपघात
मथुराचे एसएसपी श्लोक कुमार म्हणाले की, इकोचालक झोपेमुळे अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत आणि जखमींच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. इको दिल्लीहून आग्र्याला जात होती. कारमध्ये 9 जण होते. 6 जणांचा मृत्यू झाला. जखमींना आग्रा येथे रेफर करण्यात आले आहे. ती कार कोणाची होती हे शोधले जात आहे. मुख्यमंत्री योगी यांनीही अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार देण्यास सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























