Building Collapsed in Delhi: राजधानी दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; 14 महिन्यांच्या मुलांसह 8 जखमी, ढिगाऱ्यात अजूनही लोक अडकल्याची भीती
Building Collapsed in Delhi: इमारत कोसळली तेव्हा स्थानिक लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. या लोकांनी सर्वप्रथम बचावकार्य सुरू केले.

Building Collapsed in Delhi: शनिवारी सकाळी दिल्लीतील वेलकम परिसरात एक चार मजली इमारत कोसळली. इमारतीत 10 जणांचे कुटुंब राहत होते. या अपघातात 14 महिन्यांच्या मुलासह आठ जण जखमी झाले आहेत. अजूनही तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीलमपूरमधील इदगाह रोडजवळील जनता कॉलनीतील स्ट्रीट क्रमांक 5 मध्ये सकाळी 7 वाजता एक इमारत कोसळली. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. इतर अनेक संस्था देखील मदत कार्यात गुंतल्या आहेत.
#WATCH | Delhi: Locals help in clearing the debris after a ground-plus-three building collapses in Delhi's Seelampur. 3-4 people have been taken to the hospital. More people are feared trapped. https://t.co/VqWVlSBbu1 pic.twitter.com/UWcZrsrWOb
— ANI (@ANI) July 12, 2025
ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
इमारत कोसळली तेव्हा स्थानिक लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. या लोकांनी सर्वप्रथम बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. नंतर अग्निशमन दलाच्या मदतीने तीन जणांना वाचवण्यात आले. ईशान्य दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा म्हणाले की, बचावकार्य सुरू आहे. पोलिस, एनडीआरएफ, नागरी संरक्षण आणि स्थानिक लोक घटनास्थळी काम करत आहेत. स्थानिक लोकांनी बचावकार्यात खूप मदत केली आहे.
VIDEO | Delhi: A four-storey building collapsed in Welcome area of northeast Delhi on Saturday morning and some people could be trapped under the rubble, police said. A rescue operation by multiple agencies is underway, they said. #DelhiNews #BuildingCollapse
— Press Trust of India (@PTI_News) July 12, 2025
(Full video… pic.twitter.com/Xav2jR1VVR
3 महिन्यांपूर्वी इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू
दरम्यान, दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात 18 एप्रिल रोजी चार मजली इमारत कोसळली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. 20 वर्षे जुनी इमारत कोसळल्यानंतर 12 तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू राहिले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इमारतीत 22 लोक राहत होते. त्यापैकी इमारतीचा मालक तहसीन आणि त्याच्या कुटुंबातील 7 सदस्यांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























