एक्स्प्लोर
पतंजलीच्या फूडपार्कसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून हत्तीणीचा मृत्यू
आसाम : आईच्या ममतेनं माणसंच काय तर जनावरंही गहिवरुन जातात. अशीच एक हृदयद्रावक घटना आसामच्या सोनितपूर इथं घडली आहे. हत्तीण एका खड्ड्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला. अनेक तास होऊनही हत्तीण हालचाल करत नसल्यानं तिच्या 2 वर्षाच्या पिल्लानंही खड्ड्यात उडी घेतली आणि अनेक तास ते पिल्लू हत्तीणीला आपल्या सोंडेनं हलवत राहिलं.
शेवटी काही माणसं त्याठिकाणी पोहोचली आणि मृत हत्तीण आणि या पिल्लाला या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं. दरम्यान, हा आणि असे अनेक खड्डे हे रामदेवबाबा यांच्या फूडपार्कसाठी खोदण्यात आले असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मात्र, या भागात हत्तींचं प्राबल्य जास्त असल्यानं खड्डे खोदले जाऊ नये, अशी मागणी केली गेली होती. मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं. याप्रकरणी पतंजली फूडपार्कचे निर्माते उदय गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI_news/status/802181180468531200
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement