एक्स्प्लोर
नोटाबंदी : 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा!
नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले आहेत.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी जाहीर केली आहे. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर 1000 च्या जवळपास 99 टक्के नोटा बँकेत परत आल्या, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालात मार्च 2017 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे. 1000 रुपयांच्या जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या आहेत. एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
नोटा छपाईचा खर्च वाढला
दरम्यान नोटा छपाईचा खर्चही या आर्थिक वर्षात दुप्पट झाल्याची माहिती आरबीआयने दिली. 2016-17 या वर्षात नोटा छपाईचा खर्च 7 हजार 965 कोटी रुपये झाला आहे, जो 2015-16 या वर्षात 3 हजार 421 कोटी रुपये एवढा होता.
नोटाबंदीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. त्यानंतर 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात आणल्या. नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या. ज्याची आकडेवारी आरबीआयने जवळपास दहा महिन्यांनी जाहीर केली आहे.
आरबीआयचा आर्थिक अहवाल काय सांगतो?
- एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही.
- 500 रुपयांच्या जुन्या नोटेमध्ये 7 हजार 100 कोटी रुपये परत आले नाही आणि उर्वरित नोटा बनावट आणि फाटलेल्या होत्या.
- एकूण 16 हजार कोटी रुपये परत आले नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement