95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही, योगींच्या मंत्र्याचं बेताल वक्तव्य
UP Minister defends fuel price hike : कोरोना संकाटत सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसत असतानाच योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यानं बेताल वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे
UP Minister defends fuel price hike : देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनं थैमान घातलं आहे. कोरोना संकाटत सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसत असतानाच योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यानं बेताल वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपचे मंत्री उपेंद्र तिवारी (UP Minister Upendra Tiwari) यांनी पेट्रोल दरवाढीवर सरकारची पाठराखण करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही, असं बेताल वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केलं आहे.
उपेंद्र तिवारी यांनी असा दावा केलाय की, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालीच नाही. देशातील 95 टक्के लोक पेट्रोल-डिझेलचा वापरच करत नाहीत. काही मोजके लोक चारचाकी गाडीचा वापरत करतात. बेरोजगारीच्या प्रश्नावर तिवारी म्हणाले, राज्यात वर्तमानकाळात जो परीक्षा पास करेल तो आधिकारी बनेल. ते उरई येथे आजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित होते.
#WATCH | Jalaun: UP Min Upendra Tiwari says, "...Only a handful of people use 4-wheelers & need petrol. 95% of people don't need petrol. Over 100 cr vaccine doses were administered free of cost to people...If you compare (fuel price) to per capita income, prices are very low now" pic.twitter.com/rNbVeiI7Qw
— ANI UP (@ANINewsUP) October 21, 2021
कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि बेरोजगारीवरुन प्रश्न विचारले. त्यावेळी बोलताना उपेंद्र यादव यांनी 95 टक्के लोक पेट्रोलचा वापर करत नसल्याचं बेताल वक्तव्य केलं. तर बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने 100 कोटी पेक्षा आधिक लसीचे डोस मोफत दिले आहेत. जर याची (इंधन दरवाढीसोबत) प्रति व्यक्तीसोबत तुलना केली. तर सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती खूप कमी आहेत.
बेरोजगारीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना तिवारी म्हणाले की, याआधी पीसीएस तयार करण्याची पॅक्टी समाजवादी पक्षाच्या कार्यालयात होती. पण योगी सरकारच्या कार्यकाळात जो परिक्षा पास होईल, तोच आधिकारी होईल.