7th Pay Commission : खुशखबर! 16 मार्चला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट! खात्यात येणार 38,692 रुपये
7th Pay Commission Latest News : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) तीन टक्क्यांनी वाढणार असून, त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 16 मार्च रोजी मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे. पहिल्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो, मात्र तो 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे, म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
जानेवारीत जाहीर होणार वाढ
सरकार होळीपूर्वीच महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. कर्मचार्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2022 पासून वाढवला जाणार होता. परंतु आता सरकार 16 मार्च रोजी डीए वाढवण्याची घोषणा करू शकते असे मानले जात आहे.
16 मार्च रोजी होऊ शकते बैठक
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता जाहीर केला जातो. यावेळी 16 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. सध्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे वाढ जाहीर झालेली नाही.
जुलैमध्ये पुन्हा केली जाणार मोजणी
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. याशिवाय, जुलै 2022 मध्ये पुन्हा महागाई भत्त्याची मोजणी केली जाईल.
होळीनंतर मिळणार पूर्ण पैसे
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम होळीनंतर दिली जाण्याची शक्यता आहे. होळीनंतर कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे सर्व पैसे मिळतील. जर तुमचा मूळ पगार 18,000 ते 56,900 रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुम्ही 34 टक्के दराने DA काढला तर तुमचा महागाई भत्ता दरमहा 19,346 रुपये होईल. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना 17,639 रुपये थकबाकी मिळत आहे.
खात्यात 38,692 रुपये येणार येणार
कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये एकूण 1707 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर त्याची मोजणी केली तर ते सुमारे 20,484 रुपये इतकी आहे. कर्मचाऱ्यांना मार्चमध्ये 2 महिन्यांची थकबाकी दिली जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 38692 रुपये थकबाकी म्हणून येतील.
'या' कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ
अलीकडेच केंद्रीय सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ करण्यात आली. यापूर्वी कर्मचाऱ्यांना सुमारे 170 टक्के महागाई भत्ता मिळत होता, त्यात 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. आतापासून कर्मचाऱ्यांना 184 टक्के डीए मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मंत्र्यांच्या मुलीनं केलं पळून लग्न, आता जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षणाची मागणी
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4575 रुग्ण, 145 जणांचा मृत्यू
- Viral : जपानमध्ये 1000 वर्षांपासून कैद असलेलं भयानक भुत मुक्त? स्थानिकांची उडाली झोप, काय आहे सत्य?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha