एक्स्प्लोर
चेन्नईत जयललितांचा चेहरा असलेली भव्य इडली!
चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या स्मरणार्थ चेन्नईत एक भव्य इडली बनवण्यात आली आहे. चेन्नईच्या मरिना बीचवर ही तब्बल 68 किलो वजनाची इडली बनवली आहे.
या इडलीवर जयललिता यांच्या चेहरा साकारण्यात आला आहे. जयललिता यांनी तब्बल सहा वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं.
5 डिसेंबर रोजी जयललिता यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात दुख:चं वातावरण आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या अम्माच्या स्मरणार्थ ही भव्य इडली बनवत चाहत्यांनी जयललिला यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तामिळनाडूत तब्बल 597 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा जयललितांचा पक्ष एआयएडीएमके यांनी केला आहे.
दरम्यान, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी, जयललितांच्या निधनाच्या धक्क्याने मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement