एक्स्प्लोर
38 दिवसांनी अखेर हनीप्रीत जगासमोर, आज सरेंडर करण्याची शक्यता
राम रहीमही निर्दोष असल्याचं सांगत, मी त्यांना वडिलांप्रमाणे मानते आणि आमचं नातं अतिशय पवित्र आहे, असं ती म्हणाली.
![38 दिवसांनी अखेर हनीप्रीत जगासमोर, आज सरेंडर करण्याची शक्यता 38 Days Honeypreet Is Finally In Front Of The World Likely To Surrender Today 38 दिवसांनी अखेर हनीप्रीत जगासमोर, आज सरेंडर करण्याची शक्यता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19110533/honeypreet.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर फरार झालेली त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत अखेर समोर आली आहे. पोलिसांना सातत्याने चकवा देत असलेली हनीप्रीत मंगळवारी 38 दिवसांनंतर न्यूज चॅनलवर आली आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
राम रहीमही निर्दोष असल्याचं सांगत, मी त्यांना वडिलांप्रमाणे मानते आणि आमचं नातं अतिशय पवित्र आहे, असं ती म्हणाली. तसंच बदनामी करण्यासाठी माझ्यावर आरोप लावले जात असल्याचं तिने सांगितलं.
न्यायालयीन सल्ला घेतल्यानंतर आपण पंजाब-हरियाणा हायकोर्टात हजर राहणार असल्याचंही हनीप्रीतने सांगितलं आहे.
हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. पंचकुलामध्ये हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली हनीप्रीतविरोधात सेक्टर-5 पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. साध्वींवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राम रहीमला पोलिस कोठडीतून पळवण्याचा कट हनीप्रीतने रचला होता, असा आरोप आहे.
एवढे दिवस बेपत्ता असल्याच्या प्रश्नावर हनीप्रीतने उत्तर दिलं की, मला काहीच समजत नव्हतं. मी कशीतरी हरियाणातून दिल्लीला गेले. आता हरियाणा-पंजाब कोर्टात जाणार आहे. कायदेशी सल्ल्यानंतरच पोलिसांना शरण येण्याबाबतचा निर्णय घेईन, असंही हनीप्रीत म्हणाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)