एक्स्प्लोर

31 December In History : ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, राजीव गांधी बनले देशाचे सातवे पंतप्रधान, 'कोविड 19' वर शिक्कामोर्तब; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...

Din Vishesh: ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company) आजच्याच दिवशी झाली होती. 2019 साली  कोरोनाचा विषाणू 'कोविड 19' वर शिक्कामोर्तब झालं होतं. आज इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या...

On This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात  (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 31 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवशी अनेक महत्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company) आजच्याच दिवशी झाली होती. राजीव गांधींनी  ( Rajiv Gandhi took his oath as prime minister )आजच्याच दिवशी भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. 2019 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (World Health Organization) पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्ये "व्हायरल न्यूमोनिया" प्रकरणांची माहिती मिळाली. हा रोग नंतर COVID-19 असल्याचे निश्चित केले गेले. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


1600 - ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company)

ईस्ट इंडिया कंपनी ही एक खाजगी व्यापारी कंपनी होती, जिने 1600 मध्ये इंग्लंडच्या राजेशाही सनदेद्वारे व्यापाराचा अधिकार प्राप्त केला होता. 1600 च्या शतकाच्या शेवटच्या दिवशी राणी एलिझाबेथ I च्या घोषणेद्वारे याची स्थापना करण्यात आली. ही लंडनच्या व्यापार्‍यांची कंपनी होती, जिला पूर्वेकडील व्यापाराची मक्तेदारी देण्यात आली होती. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट पैसे कमविणे हेच होते. 1608 मध्ये कंपनीचे पहिले व्यापारी जहाज भारतात सुरतला पोहोचले, कंपनीला मसाल्याचा व्यापारी म्हणून आपला व्यवसाय सुरू करायचा होता. सन 1708  मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी 'न्यू कंपनी' 'ईस्ट इंडिया कंपनी'मध्ये विलीन झाली. पुढे या कंपनीनं आपलं जाळं इतकं मजबूत केलं की इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं. 

1857 : ओटावा शहराला कॅनडाची राजधानी घोषित केलं (Ottawa made capital of Canada)

कॅनडाची राजधानी ओटावा आहे. संपूर्ण देशाचा कारभार याच ठिकाणाहून चालतो. हे शहर ओटावा नदीच्या काठावर वसलेले आहे. आजच्याच दिवशी या शहराला राजधानी घोषित केलं होतं. 1857 मध्ये या दिवशी राणी व्हिक्टोरियाने कॅनडाची राजधानी म्हणून ओटावा नाव दिले.

1910  - मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म (Mallikarjun Mansoor)

हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, नीलकंठबुवा अलुरमठ आणि  जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले. पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांचा मृत्यू 12 सप्टेंबर 1992 रोजी झाला.

1926  - इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा मृत्यू 

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगडमधील वरसईमध्ये 24 जून 1863 साली झाला होता.  त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे 22 खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. 1898 साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. 

1929-  महात्मा गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह लाहोरमध्ये पूर्ण स्वराजसाठी आंदोलन सुरु केलं 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं भारताच्या स्वातंत्र्यासाठीचं योगदान अतुलनीय आहे. त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेकदा आंदोलनं पुकारली होती. आजच्या दिवशी 1929 साली महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाहोरमध्ये पूर्ण स्वराजसाठी आंदोलनाला सुरुवात केली.

1951- खासदार अरविंद सावंत यांचा जन्म (Shiv Sena MP Arvind Sawant Birthday)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा जन्म 31 डिसेंबर 1951 साली झाला. ते शिवसेनेचे सदस्य असून १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे सदस्य असलेल्या सावंत ह्यांनी 2014  लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार मिलिंद देवडा यांचा 1 लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. 2019 मध्ये पुन्हा ते निवडून गेले. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळालं. मात्र नंतर शिवसेना-भाजप संघर्षामुळं त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते शिवसेना ठाकरे गटातील महत्वाचे नेते आहेत. 

1984 - राजीव गांधी भारताचे सातवे पंतप्रधान बनले  ( Rajiv Gandhi took his oath, he was the youngest prime minister )

राजीव गांधींनी आजच्याच दिवशी भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. वयाच्या 40 व्या वर्षी ते भारताचे पंतप्रधान झाले होते. ते सर्वात तरुण पंतप्रधान होते.   त्यांच्या मातोश्री   इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा त्या 48 वर्षांच्या होत्या तर त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळी ते 58 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.31 ऑक्टोबर 1984 रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दु:खद परिस्थितीत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे पंतप्रधान बनले होते. परंतु वैयक्तिक पातळीवर इतके दु:खी असूनही संतुलन, मर्यादा आणि संयमाने त्यांनी राष्ट्रीय जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली.

1984 - मो. अझरुद्दीनचं कसोटी पदार्पण 

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळून सुरुवात केली. पुढे तो भारतीय संघाचा कर्णधारही झाला.

1986 - राजनारायण यांचा मृत्यू  (Raj Narayan ) 

राज नारायण  हे एक भारतीय राजकारणी होते. राजनारायण यांनी रायबरेली येथून इंदिरा गांधींचा पराभव केला होता. त्यांना 'लोकबंधू' असं देखील म्हटलं जायचं

1997  - स्वरराज छोटा गंधर्व यांचं निधन

सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील भाडळे या गावी 10 मार्च 1918 रोजी  झाला होता. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.  ते मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार म्हणून नावारुपाला आले. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द 50  वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. 


1999 : बोरिस येल्त्सिन यांचा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा (Russian President Boris Yeltsin resigned)

बोरिस येल्त्सिन यांनी 1999 साली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी राजीनामा दिला आणि पंतप्रधान व्लादिमीर पुतिन कार्यवाहक अध्यक्ष झाले. पुढच्याच वर्षी पुतिन यांची या पदावर निवड झाली. अजूनही रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन ठाण मांडून आहेत. 

1999 : पनामा कालव्यावर पनामा देशाचे पूर्ण नियंत्रण

1999 : पनामा कालव्यावर पनामा देशाचे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.

2018  कादर खान यांचं निधन (Kader Khan Death anniversary)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, संवाद लेखक कादर खान यांचा आजच्या दिवशी कॅनडामध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या जन्म बलुचिस्तानमध्ये 18 डिसेंबर 1937 रोजी झाला होता.  हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि अभिनय क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमावलं.

2019 - कोरोनाचा विषाणू 'कोविड 19' वर शिक्कामोर्तब (“viral pneumonia” cases in Wuhan, China;  disease was later determined to be COVID-19)

2019 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (World Health Organization) पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्ये "व्हायरल न्यूमोनिया" प्रकरणांची माहिती मिळाली. हा रोग नंतर COVID-19 असल्याचे निश्चित केले गेले. यापुढं काय घडलं ते आपण पाहिलंच. जगभरात या व्हायरसनं धुमाकूळ घातला. लाखो लोकांचे बळी या कोरोनानं घेतले. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनामुळं लॉकडाऊन करावा लागला. अजूनही हा विषाणू पूर्णपणे संपलेला नाही.  जे पुढील वर्षी जागतिक महामारी बनले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget